esakal | शिवजयंतीच्या निमित्ताने महिला सुरक्षेसाठी बनवले अॅप
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

शिवजयंतीच्या निमित्ताने महिला सुरक्षेसाठी बनवले अॅप

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : देशभरासह राज्यात महिलांवर होणारे हल्ले, अत्याचार रोखण्यासाठी शिवप्रेमी पुढाकार घेतील, असा संकल्प बुधवारी (ता. 12) जिल्हा शिवजयंती उत्सव समितीने केला आहे. शिवाय, या अनुषंगाने एका ऍपची निर्मिती देखील करण्यात आली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांची बुधवारी (ता.19) जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने बुधवारी समितीचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आकाशवाणीजवळ बैठक पार पडली. शिवजयंती कशा प्रकारे साजरी करावी, याबाबत शिवप्रेमींच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. या सूचनांचे संकलन करून त्यावर योग्य पद्धतीने समितीकडून अंमलबजावणी करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

औरंगाबादचे संभाजीनगर करा, वाचा कोणी केला शिवसेनेचा मुद्दा हायजॅक 

तसेच एक राजा एक जयंती साजरी व्हावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. यंदा अत्यंत आगळ्यावेगळ्या अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिवजयंतीनिमित्त हेलिकॉप्टरमधून जिल्हाभरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पवृष्टीने अभिवादन येईल. विविध उपक्रम आणि समित्या स्थापन करून लवकरच त्या जाहीर करण्यात येतील, असेही यावेळी स्पष्ट केले.

व्हायरल क्लिपमधला अमोल कोण... 

यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, मनपातील कॉंग्रेस गटनेते भाऊसाहेब जगताप, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक अभिजित देशमुख, डी. एन. पाटील, नगरसेवक राज वानखेडे, विनोद बनकर, किशोर चव्हाण, सतीश वेताळ, प्रा. शिवानंद भानुसे, सुरेश वाकडे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र दाते पाटील यांनी केले.

महिला सुरक्षेसाठी ऍप 

देशासह राज्यातील महिलांबाबत निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता शासनालाच मार्गदर्शक ठरेल अशा एका आगळ्या-वेगळ्या अँपची निर्मिती करण्याचे काम महोत्सव समितीने केले आहे. या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त समस्त महिला वर्गाला ही एक आगळीवेगळी भेट ठरणार आहे. शासनाला या उपक्रमाचा फायदा कायदा- सुव्यवस्था योग्य पद्धतीने राखण्यासाठी होईल, असा आशावाद श्री. पाटील यांनी व्यक्‍त केला. 

वाचा ः वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

loading image