esakal | निवारागृह सोडताना ते ७१ जण का झाले भावुक  
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

औरंगाबाद शहरापासून जवळच्या भागातील रहिवासी असलेल्या मजूरांना शहर बसव्दारे त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सिडको एन-६ येथील निवारागृहातून ७१ जणांना सकाळी अकरा वाजता बसेसद्वारे जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, जळगाव येथे रवाना करण्यात आले.

निवारागृह सोडताना ते ७१ जण का झाले भावुक  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेच्या निवारागृहात गेल्या दीड महिन्यांपासून थांबलेल्या ७४ जणांना शनिवारी (ता. नऊ) महापालिकेने त्यांच्या घरी पाठविले. ७१ जण राज्यातील विविध जिल्ह्यातील तर तीन जण औरंगाबाद शहरातील रहिवासी होते. या मजुरांच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने घेतली असून, शहर बसने या सर्वांना रवाना करण्यात आले. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी हजर राहत त्यांना बाय बाय केला. 

लॉकडाऊमुळे देशभर लाखो मजूर अडकून पडले आहेत. परराज्यातील मजूरांना गावी पाठविण्यासाठी विशेष रेल्वे सोडल्या जात आहेत. मात्र राज्यातील रहिवासी असलेल्या मजुरांचा प्रश्‍न मार्गी लागला नव्हता. महापालिकेच्या विविध शाळांमध्ये १५९ जणांची व्यवस्था करण्यात आली होती. यातील मध्यप्रदेशातील रहिवासी असणाऱ्या २८ जणांना नुकतेच सोडण्यात आले होते.दरम्यान महापालिकेने औरंगाबाद शहरापासून जवळच्या भागातील रहिवासी असलेल्या मजूरांना शहर बसव्दारे त्यांच्या गावापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सिडको एन-६ येथील निवारागृहातून ७१ जणांना सकाळी अकरा वाजता बसेसद्वारे जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, जळगाव येथे रवाना करण्यात आले.

तीन जण शहरातीलच आहेत. यात सात महिला, आठ लहान मुलांचा देखील समावेश आहे. यावेळी अस्तिककुमार पांडेय यांनी उपस्थित राहून नागरिकांना निरोप दिला. दीड महिन्यांपासून महापालिकेच्या निवारागृहात सुविधा घेणारे हे मजूर जाताना मात्र भावुक झाले तर दुसरीकडे घरी परतण्याच्या ओढीने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही होता, असे सहायक आयुक्त विजया घाडगे यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा


महापालिकेने घेतली जबाबदारी 
मजूरांना पाठविण्याचा खर्च कोणी करायचा यावरून देशभर राजकारण सुरू आहे. महापालिकेने मात्र या मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलला आहे. शहर बस महापालिकेच्या असल्याने फक्त डिझेलचा खर्च करावा लागला, असे घाडगे यांनी सांगितले. सुरवातील २८ आता ७१ जण गावी गेले असले तरी निवारागृहात आणखी १८ जण आहेत. त्यांना दोन दिवसांत रेल्वे व बसने सोडले जाणार आहे. यात उत्तर प्रदेशचे सहा, बिहार व राज्यस्थान येथील प्रत्येक एकाचा समावेश आहे. दहा जण हे राज्यातीलच आहेत. 

मजुरांची आकडेवारी 
जालना- ५ 
बुलडाणा- ५ 
अकोला-६ 
वाशिम- १३ 
भोकरदन-१९ 
जळगाव - २३ 
औरंगाबाद शहर-३