
छावणी परिषदेने केली पोलिसांकडे तक्रार
CoronaVirus : बेकरीत कोरोना, ही नुसतीच आफवा
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या हद्दीत अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. परिसरातील एका बेकरीत दोन कामगारांना कोरोना झाल्याची बातमी निराधार असल्याची माहिती छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर खोटे, निराधार, आणि दिशाभूल करणारे मेसेजेस व्हॉट्सॲप व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमाने पसरविण्यात येत आहेत. मेसेज पसरविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. असे असले तरीही अफवांचे पीक थांबत नाही.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
सोशल मीडियावर अफवा
बुधवारी (ता. २९) सकाळपासूनच छावणी परिसरातील एका बेकरीतील दोन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत होती. याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी तातडीने खुलासा केला. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्तांनाही पत्र पाठविले आहे. छावणी परिसरातील रुग्णालय आणि परिसरामध्ये सातत्याने साफसफाई, स्वच्छता करण्यात येत आहे.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
कोरोनाचा रुग्ण नाही
अद्यापपर्यंत या भागात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याच्या अफवा निराधार असल्याने या विरोधात चौकशी करून कारवाई करावी, अशी विनंती पोलिस आयुक्तांना केली आहे. छावणी परिषदेने परिसरात पूर्वी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकानांना उघडे ठेवण्यासाठी परवानगी दिली होती.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
अफवांवर विश्वास ठेवू नका
मात्र पोलिस आयुक्तांनी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यत परवानगी दिल्याने हा नवीन आदेश छावणी परिषदेतही लागु राहणार असल्याचे श्री. मोरे यांनी सांगितले. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, लॉकडाउनच्या अनुषंगाने घराबाहेर पडू नये, असे आवाहन श्री. मोरे यांनी केले.