esakal | दक्षता : दिवाळीतही सुरू राहणार कोरोनाच्या चाचण्या, १६ केंद्रावर कर्मचारी तैनात  
sakal

बोलून बातमी शोधा

corona photo.jpg

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे महापालिकेने शहरातील १६ कोरोना चाचणी केंद्र दिवाळीतही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रावर नियमित कोरोना चाचण्या होतील, असे आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

दक्षता : दिवाळीतही सुरू राहणार कोरोनाच्या चाचण्या, १६ केंद्रावर कर्मचारी तैनात  

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे महापालिकेने शहरातील १६ कोरोना चाचणी केंद्र दिवाळीतही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रावर नियमित कोरोना चाचण्या होतील, असे आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.
 मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत आहे. असे असले तरी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त करत आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळी सणातही कोरोना चाचण्या सुरूच ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. दिवाळीमुळे शहरातील बहुतांश आस्थापना, बॅंका, सरकारी कार्यालयांना तीन ते चार दिवस सुट्या आहेत. पण महापालिकेचे आरोग्य, पाणी पुरवठा, अग्निशमन, स्वच्छता आणि घनकचरा विभाग मात्र सुरूच आहेत. दरवर्षी आरोग्य केंद्र दिवाळीनिमित्त एक-दोन दिवस बंद राहत होते. यंदा कोरोनामुळे सर्व केंद्रावर नियमित चाचण्या सुरु राहणार आहेत, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या ठिकाणी होतील चाचण्या 
एमआयटी हॉस्टेल, बीड बायपास, ईओसी पदमपूरा, समाजकल्याण हॉस्टेल किलेअर्क, एमजीएम स्पोर्ट कॉम्पलेक्स, सिपेट चिकलठाणा (२४ तास सेवा). तसेच बायजीपूरा आरोग्य केंद्र, तापडिया मैदान, अदालत रोड, रिलायन्स मॉल गारखेडा, महापालिका आरोग्य केंद्र एन- ११, आरोग्य केंद्र राजनगर, सिडको एन- २ कम्युनिटी सेंटर, हर्षनगर, चिकलठाणा, सिडको एन-८ आणि शिवाजीनगर आरोग्य केंद्र व छावणी परिषद रुग्णालयात सकाळी ११ ते सांयकाळी सहा यावेळेत कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image