Corona Virus : चांगल्या आरोग्यासाठी आहार,विहार,विश्रांती, मन:शांती ही चतुःसूत्री 

आहारतज्ज्ञ व योगतज्ज्ञ रसिका देशमुख
आहारतज्ज्ञ व योगतज्ज्ञ रसिका देशमुख

औरंगाबाद - लॉकडाऊनमुळे सर्वजन घरात आहेत. या काळात आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकांनी आहार, विहार, विश्रांती आणि मन:शांती या चतु:सूत्रीचा अवलंब केला पाहिजे. हे दिवसही जातील अशी मानसिकता तयार करून सकारात्मकता वाढवावी असा सल्ला आहारतज्ज्ञ व योगतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी दिला आहे. 

रसिका देशमुख या इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात कुकरी विषयाच्या प्राध्यापिकापदावरून निवृत्त झाल्या आहेत. १९८७ पासून औरंगाबादमध्ये आहारतज्ज्ञ म्हणून स्वत:चे डाएट सेंटर चालवतात. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनामुळे सर्वजण चिंताग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीमती देशमुख म्हणाल्या, स्वतःची काळजी घेणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. हा विषाणू आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी शरीरात तशी सैनिकी फौज तयार करावी लागेल. यासाठी चतुःसूत्रीचे पालन करावे लागेल. यात आहाराला अग्रक्रम देऊन रोगप्रतिकारशक्ती आणि आपली ऊर्जा वाढवावी लागणार आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हे करा 

  •  आहारात प्रथिनांवर भर द्या, मोड आलेले कडधान्य, अंडी, चिकन, मशरूम, दूध, दह्याचा समावेश करा. 
  •  जास्तीत जास्त फळे व भाज्या खा, मग भाज्या, फळे खा किंवा सूप, ज्यूस करून पोटात जाऊ द्या 
  •  काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुके असा सुकामेवा याचे प्रमाण ठरवून सेवन करा. हे शक्य नसेल तर कच्चे शेंगदाणे खा. 
  •  सध्या आपण घरात बसून काम करतो, टी.व्ही. पाहत बसून असल्याने शरीराची जास्त हालचाल होत नसल्याने तेल, तुपाचा वापर कमी करा. 
  •  जेवणाच्या पूर्वी जशा वेळा पाळत होतो तशाच ठेवा. दोन जेवणाच्या मध्ये चार ते पाच तासाचे अंतर ठेवा. 
  •  कडीपत्त्याची चटणी, मेतकूट, सातूचे पीठ, भाजणीचा आहारात समावेश करा. 
  •  कडीपत्त्याच्या रसासोबत आवळ्याचा ज्यूस घ्यावा. आवळा ज्यूस मिळाला नाही तर आवळा सुपारी, पावडर, मोरावळा यांपैकी काहीही चालेल. 
  •  चहा हे उत्तम ॲन्टि आॅक्सिडंट असून दिवसातून तीन - चार वेळा चहा प्या, मात्र त्यात साखरेचे प्रमाण कमी ठेवा. 
  •  सकाळी लिंबू पाणी किंवा कोमट पाण्यासोबत पाव चमचा हळद घ्या. रात्री दुधात हळद, सुंठ, जेष्ठमध टाकून प्यावी. 
  •  घराच्या गच्चीवर किंवा अंगणात फिरा, दोरीवरच्या उड्या मारा, सूर्यनमस्कार करा. वयोमानानुसार झेपेल तेवढा आणि जमेल तेवढा रोज व्यायाम करा. प्राणायाम करा यामुळे शरीरात कार्बंडाय आॅक्साईड साचून राहणार नाही व आॅक्सीजन शरीराला मिळून उत्साही वाटेल. 
  •  रोज रात्री साडे सहा ते सात तास झोप घ्या आणि दिवसा तासाभराची वामकुक्षी घ्या यामुळे नवीन ऊर्जेचा संचय झाल्याचे जाणवेल. 
  •  लॉकडाऊनमुळे आपण घरात खूप कामे करतो, व्यायामाची काय गरज असे न मानता. कामे म्हणजे एक्झरसाईज नव्हे तर ते एक्झर्शन आहे. यामुळे शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज असते. 
  •  मनःशांतीसाठी अनेक आध्यात्मिक उपाय आहेत. याशिवाय जुने छंद आठवून आता वेळ मिळालाय तर तो जोपासा. चिंता, भिती, तणाव विसरून मनःशांती मिळेल आणि तुम्ही स्वतः आणि इतर कुटूंबीयही आनंदी राहू शकेल. 
  •  
     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com