esakal | औरंगाबादेत आज थोडासा दिलासा, दिवसभरात १३० जण बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

एकूण ४४३ जणांचा मृत्यू झाला असुन ४ हजार ५९ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज दुपारनंतर ८४ रुग्णांची वाढ झाली. यात अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३७ जण, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाच्या तपासणीत ४४ जण बाधीत आढळले.

औरंगाबादेत आज थोडासा दिलासा, दिवसभरात १३० जण बाधित 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत घट आढळुन आली. नियमीत तीनशे ते चारशे रुग्ण दरदिवशी आढळत असताना दिलासादायक म्हणजे आज (ता. २६) १३० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले. आता जिल्ह्यात आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ३८  झाली. मात्र सहा जणांचे मृत्यूही झाले आहेत.

एकूण ४४३ जणांचा मृत्यू झाला असुन ४ हजार ५९ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज दुपारनंतर ८४ रुग्णांची वाढ झाली. यात अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३७ जण, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाच्या तपासणीत ४४ जण बाधीत आढळले.

जिल्ह्यात आज ३७७ जणांना सुटी झाली. यात शहरातील ३१६ व ग्रामीण भागातील ६१ जणांचा सहभाग आहे. आजपर्यंत ८ हजार ५३६  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

शहरातील बाधित रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) : 

नक्षत्रवाडी (२), भावसिंगपुरा (१), छत्रपती नगर, बीड बायपास (१), राजीव गांधी नगर (१), छावणी परिसर (३), पन्नालाल नगर (३), पद्मपुरा (१), खोकडपुरा (१), टाऊन सेंटर (२), पंचशील नगर (५), अयोध्या नगर (२), ठाकरे नगर, एन दोन (१), चेलिपुरा (१), एन दोन सिडको (१), धूत हॉस्पीटल परिसर (१), हर्सुल (३), बन्सीलाल नगर (२), श्रेय नगर (१), अन्य (१), महेश नगर (१), केशववाडी नगर (२), रहीम नगर, देवळाई चौक (१), विद्यानगर (१), उस्मानपुरा (१), एन नऊ पवन नगर (१), एन दोन सिडको (१)

ग्रामीण भागातील बाधित रुग्ण - 
वैजापूर (१), वडगाव कोल्हाटी, बजाज नगर (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), रांजणगाव (४), कन्नड बाजारपेठ परिसर (१) 

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण -  
मयूर पार्क (४), वाळूज सिडको (२), सिडको महानगर (१), छावणी (१), शेंदूरवादा (१), अन्य (७),  तीस ग्रीन स्कीम, पैठण रोड (२), रांजणगाव  (४), बीड बायपास (२), बजाज नगर (१), सावंगी (४), सिल्लोड (२), देवळाई (१), शेंद्रा एमआयडीसी (३), एन नऊ प्रताप नगर (२) 
 


कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण - ८५३६
उपचार घेणारे - ४०५९
आतापर्यंतचे मृत्यू - ४४३ 
----- 
एकूण बाधित - १३०३८ 

 

औरंगाबादेत आणखी सहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू 

औरंगाबादेत शनीवारी (ता. २५) केंद्रीय पथकांनी मृत्यू होऊ नये म्हणुन उपाय करण्याचे आवाहन केले आहे. त्या धर्तीवर स्टॅटर्जीनुसार कामही केले जात आहे. कोरोना व इतर व्याधींनी सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आज (ता. २६) जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात आली. मृतात चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत ४४३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

जालान नगर येथील ८० वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात २३ जुलैला भरती केले. त्यांचा २५ जुलैला रात्री साडेनऊला मृत्यू झाला. 
इसारवाडी, पैठणमधील येथील ७० वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात २५ जुलैला भरती केले. त्यांचा त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब होता. 

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

गणेश कॉलनीतील ७७ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात २४ जुलैला भरती केले. त्यांचा २५ जुलैला मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब होता. 
पंढरपूर, वाळूज येथील ५६ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात २५ जुलैला भरती केले. त्यांचा २६ जुलैला पहाटे सहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आदी व्याधी होत्या. 

हेही वाचा- आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

रेल्वेस्थानक रोड, उस्मानपुरा येथील ६६ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात १४ जुलैला भरती केले. त्यांचा २५ जुलैला रात्री साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब होता. 
खुलताबाद (जि. औरंगाबाद) येथील ६० वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात १७ जुलैला भरती केले. त्यांचा २६ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी व्याधी होत्या. 

हेही वाचा-  व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात  

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?