Aurangabad : लग्न आटोपून घरी परतणाऱ्या दांपत्यास लुटले, पैठणमधील घटना

दांपत्यास रस्त्यात अडवून चौघां जणांनी जिवे मारण्याची धमकी देत भरदुपारी लुटले.
Aurangabad Crime news
Aurangabad Crime newsesakal

पाचोड (जि.औरंगाबाद) : रांजनगाव (दांडगा) (ता.पैठण) येथून आपल्या नातेवाईकाचे लग्न आटोपून दुचाकीने आपल्या गावी नवगाव (ता.पैठण) येथे परतणाऱ्या दांपत्यास रस्त्यात अडवून चौघां जणांनी जिवे मारण्याची धमकी देत भरदुपारी लुटले. ही घटना मुरमा (ता.पैठण) शिवारात सोमवारी (ता.२४) घडली. अधिक माहिती अशी, नवगाव (ता.पैठण) (Paithan) येथील इलीयासखाँ अहेमदखाँ पठाण (वय ५७) हे आपल्या पत्नीसह नातेवाईकाच्या लग्नासाठी रांजनगाव दांडगा येथे दुचाकीने गेले होते. लग्न आटोपून दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते गावी जाण्यासाठी दुचाकीवरून लिंबगाव-केकत जळगाव रस्त्याने निघाले असता मुरमा शिवारात येताच अचानक चौघां जणांनी त्यांना अडवुन, त्यांच्याशी झटापट करून जिवे मारण्याची धमकी देत इलियासखाँ यांच्या जवळील अँड्रॉईड मोबाईल हिसकावला तर त्यांच्या पत्नीच्या हातातील पर्सबॅग हिसकावुन घेतली.(Couple Looted By Four Men In Paithan Taluka Of Aurangabad)

Aurangabad Crime news
खड्डा चुकविण्याचा नादात घडला भीषण अपघात, तिघा भावंडांचा जागीच मृत्यू

'त्या' पर्समध्ये रोख तीन हजार रुपये रोख व काही दागिने होते. यांची झटापट सुरु असताना बाजुच्या शेतातील शेतमजुर त्यांच्याकडे येत असल्याचे पाहुन चोरट्यांनी पर्स व मोबाईल घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर घाबरलेल्या या दांपत्यांनी थेरगाव (ता.पैठण) येथील त्याच्या नातेवाईकांना घडलेली हकीकत सांगितली व त्यानंतर त्यांनी तातडीने पाचोड पोलिस ठाणे गाठून पोलिसांसमोर सर्व कैफियत सांगितली. पोलिसांनी त्यांची तक्रार घेऊन चोरट्यांचा शोध घेतला. मात्र चोरटे सापडून आले नाही. (Aurangabad)

Aurangabad Crime news
Mob-Ion कंपनी आणणार इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर धावणार १४० किमी

जमादार किशोर शिंदे, फेरोझ बर्डे, विलास काकडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मागदर्शनाखाली जमादार किशोर शिंदे व फेरोझ बर्डे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com