esakal | Coronavirus|विद्यापीठाच्या वेबसाईटवर समजणार ‘बेड’ची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

bamu

Coronavirus|विद्यापीठाच्या वेबसाईटवर समजणार ‘बेड’ची माहिती

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील हॉस्पिटलनिहाय कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध असलेल्या बेडसंदर्भातील आकडेवारी सातत्याने अपडेट केली जाणार आहे. महापालिकेच्या सहकार्याने शहर आणि जिल्ह्यातील १०५ रुग्णालये आणि कोविड सेंटरचा डाटा यात उपलब्ध आहे.

विद्यापीठाने वर्षभरात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन व कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. औरंगाबाद व उस्मानाबाद उपपरीसर येथे कोविड टेस्टिंग लॅब सुरु केल्या आहेत. यानंतर आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची होणारी धावपळ थांबविण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा: 'कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करणे ही राज्याची जबाबदारी'

संकेतस्थळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हॉस्पिटलनिहाय कोरोनाबाधितांसाठी एकूण बेड, गुंतलेले बेड आणि उपलब्ध बेडच्या गुंतलेले बेड आणि उपलब्ध बेडच्या आकडेवारीची माहिती सातत्याने अपडेट केली जाणार आहे. संबंधित हॉस्पिटल कुठे आहे. त्या हॉस्पिटलला दूरध्वनी क्रमांक, तेथील डॉक्टरांचे मोबाइल क्रमांक, हॉस्पिटलपर्यंत पोचण्याची दिशा आदी सर्व अपडेट माहिती वेबसाईटवर दिली जाणार आहे.

विद्यापीठ प्रशासनाने महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची अनुमती मागितली आहे. युनिकचे संचालक अरविंद भालेराव, प्रोग्रामर रवी बनकर, यशपाल साळवे आणि सहकारी यांनी तांत्रिक सहकार्य केले आहे. महापालिकेने कोरोबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये रिक्त बेडच्या माहितीसाठी ‘माझी हेल्थ, माझ्या हाती’ एमएचएमएच हे अ‍ॅप विकसित केले आहे. त्या अ‍ॅपचा डाटा विद्यापीठाच्या वेबसाईटला लिंक केली जाणार आहे.

हेही वाचा: Corona Updates: काळजी घ्या! मराठवाड्यात २४ तासांत १७१ जणांचा मृत्यू

याठिकाणची मिळेल माहिती

विद्यापीठाच्या संकेतस्थळाला महिन्याला ३ लाख युजर्स भेट देत असतात. त्यामुळे वेबसाईटच्या माध्यमातून कोरोनाबाधित हॉस्पिटल शोधण्यासाठी मदत होणार आहे. या अंतर्गत औरंगाबाद शहरात असलेले ८० हॉस्पिटल व कोविड सेंटरची माहिती उपलब्ध असणार आहे. तसेच जिल्ह्यातील औरंगाबाद ग्रामीण व सोयगाव ( प्रत्येकी तीन), वैजापूर व पैठण (प्रत्येकी चार), गंगापूर (सहा), कन्नड (दोन) तसेच सिल्लोड, फुलंब्री व खुलताबाद (प्रत्येकी एक) अशी २५ ठिकाणची अपडेट माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

loading image
go to top