Corona Impact| लॉकडानउमुळे थांबली वीस हजार ट्रकची चाके

ट्रान्सपोर्ट व्यवसाय डबघाईला, रोज ४० कोटींची उलाढल ठप्प
Aurangabad
AurangabadAurangabad

औरंगाबाद: कोरोनामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय डबघाईस आला आहे (corona impact on transport). अनेक कंपन्या सुरु असल्या तरीही ट्रान्सपोर्टेशन बंद असल्याने दररोज जिल्ह्यामध्ये होणारी ४० कोटींची उलाढाल ठप्प झाली. लॉकडाऊनमधून (lockdown) काही उद्योगांना सूट दिली आहे, मात्र जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व बाजारपेठ बंद असल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊमुळे उत्पादित झालेल्या मालाला उठाव नसल्यामुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे. लॉकडाऊन काळात बाहेर राज्यात गेलेल्या माल वाहतूक ट्रक परतीला माल नसल्यामुळे उभ्या राहिलेल्या आहे. कोरोना काळात दररोज ४० कोटींची उलाढाल ठप्प झालेली आहे. वाहतूक व्यावसायात जिल्ह्यात जवळपास पंचवीस हजार ट्रक आहेत. त्यापैकी केवळ दोन ते अडिच हजार ट्रक सध्या रस्त्यावर धावत आहे. एखादी ट्रक परराज्यात गेलाच तर परत येताना माल मिळत नाही, त्यामुळे ट्रक त्या राज्यात उभा करावा लागत आहे.

Aurangabad
औरंगाबादेत बालकांसाठी होणार शंभर बेडचे कोविड रुग्णालय

अनेक राज्यातून आपल्याकडे आलेली अनेक वाहने इकडे अडकून पडले आहेत. ट्रान्सपोर्ट व्यावसाय ५० टक्क्यापेक्षा खाली आला आहे, त्यातच इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने व्यावसायीक हतबल झाले आहेत.

बॅंकांचे हफ्ते कसे फेडणार?

मालवाहतूक ठप्प असल्याने आशा परिस्थितीत वाहतूकदाराना बॅंकांच्या कर्जाचे हफ्ते कसे फेडावेत असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळेच शासनाने ट्रक व तत्सम वाहनांचे कर्ज हफ्ते पुढील सहा महिन्याचे व्याज माफ करावे व कर्ज हफ्त्यांना स्थगीती द्यावी तसेच टोल नाक्यावर टोल माफ करावा अशी मागणी औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे. या संदर्भात संलग्न असलेल्या ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस (दिल्ली) व महासंघ मुंबई यांना भूमिका कळवली असल्याची माहिती औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगीतले.

Aurangabad
'शासकीय रुग्णालयांत रिक्त जागा दोन महिन्यात भरा'

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट व्यावसाय डबघाईस आहे. त्यामुळे केंद्र शासनाने भरघोस पॅकेज देण्याच्या बरोबरच दळणवळणाला चालणा दिली पाहीजे.

फय्याज खान (अध्यक्ष औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन)

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये काही उद्योगाचा माल निर्मीत होत आहे. मात्र बाजारपेठ बंद असल्याने मालवाहतूक ठप्प झालेली आहे. असे असले तरीही चालक क्लिनर यांना पगार द्यावा लागत आहे.

जयकुमार थानवी (महासचिव औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com