esakal | वीज चोरणाऱ्यांवर गुन्हा, महावितरणची राहुलनगरात कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

vijchori

राहुलनगर येथे मीटरमध्ये फेरफार करून दोघेजण वीजचोरी करीत असल्याचा प्रकार महावितरणच्या कारवाईत उघड झाला.

वीज चोरणाऱ्यांवर गुन्हा, महावितरणची राहुलनगरात कारवाई

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : राहुलनगर येथे मीटरमध्ये फेरफार करून दोघेजण वीजचोरी करीत असल्याचा प्रकार महावितरणच्या कारवाईत उघड झाला. दोन वर्षांत एक लाखांहून अधिक रकमेची वीजचोरी करणाऱ्या त्या दोघांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरी करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केलेली आहे. अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ट्रॅक्टर उलटून तीन तास वाहतूक ठप्प,ऑईल सांडल्याने वाहनांची घसराघसरी

त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन परिसरातील राहुलनगरमध्ये वीजचोरी होत असल्याची तक्रार महावितरणकडे प्राप्त झाली होती. त्यावर औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या आदेशानुसार औरंगाबाद शहर-१ विभागाचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत, छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंकर चिंचाणे, नक्षत्रवाडी शाखेचे सहायक अभियंता योगेश जाधव, प्रधान तंत्रज्ञ संजय शेजवळ यांच्या पथकाने ८ डिसेंबरला दुपारी दीड वाजता राहुलनगरमधील वीजग्राहक किशोर साहेबराव तुपे याच्या मीटरची तपासणी केली.

तुपे हा मूळ मालक असून, हे मीटर सध्या शेख सलमान शेख मुमताज वापरत आहे. तपासणीत मीटरचे सील तुटलेले आढळून आले. महावितरणच्या प्रयोगशाळेत तपासणी केली असता वायरिंगमध्ये फेरफार करून मीटरची गती कमी केल्याचे निष्पन्न झाले.

स्क्रु ड्रायव्हरने भोसकले; प्लॉटच्या वादातून भावाचा खून

 मीटरचा मूळ मालक तुपे व वापरकर्ता शेख यांनी दोन वर्षांत सुमारे ७ हजार १७१ युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी त्यास एक लाख एकहजार ९४९ रुपयांचे अनुमानित बिल व ४ हजार रुपये तडजोड शुल्क असा दंड आकारण्यात आला आहे. महावितरणचे सहायक अभियंता योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार दोन्ही आरोपींवर छावणी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.१२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image