‘फाईव्ह स्टार’ हॉटेलांमध्ये तो घ्यायचा फुकटचा पाहुणचार!

तामिळनाडूतील संशयित ज्येष्ठ नागरिकास औरंगाबादेत अटक केली आहे
Aurangabad
AurangabadAurangabad

औरंगाबाद: कृषी विषयक परिषदेच्या नावाखाली थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये महागडी दारु, सिगारेटी असा फुकटचा पाहुणचार घेत कैक लाखांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला वेदांतनगर पोलिसांनी बुधवारी (ता.९) दुपारी बेड्या ठोकल्या. भिमसेंट जॉन असे त्या भामट्याचे नाव असून त्याने आजवर शहरातील किज हॉटेल, रामा इंटरनॅशनल, एम्बॅसेडर आदी हॉटेलची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे महागड्या हॉटेल्समधील खोली घेऊन बाहेर चाललो आहे, असे म्हणून तो परस्पर गायब होत असल्याचेही उघड झाले आहे.

यासंदर्भात वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितले की, आजवर या संशयिताने विविध थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलची लाखोंची फसवणूक केली आहे. पदमपूरा, कोकणवाडी भागातील कीज हॉटेलच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. ८ जूनच्या रात्री १० वाजता कीज हॉटेलमध्ये संशयित जॉन हा थांबला असून त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने हॉटेलमालकाने वेदांतनगर पोलिसांना कळविले. नंतर हा प्रकार उजेडात आला. कीज हॉटेलमध्ये कृषी विषयक परिषद घ्यायची असल्याचे सांगून, त्याने रूम मिळविली. तसेच तो महागड्या सिगारेट आणि महागड्या दारूची मागणी करत आहे. संबंधीत ग्राहकांने त्याचे नाव खोटे सांगितले होते.

Aurangabad
Covid 19: मराठवाड्यातील प्रसार होतोय कमी; नवीन रुग्ण सातशेच्या आत

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाने दिलेल्या आधार क्रमांकावरून त्याची माहिती काढली. या माहितीत हॉटेलमध्ये थांबलेला व्यक्ती हा भिमसेंट जॉन असा आहे. या व्यक्तीच्या विरोधात कफपरेड येथील पोलिस ठाण्यात वर्ष २०१७ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या माहितीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी भिमसेंट जॉन याला ताब्यात घेतले. त्यांनी औरंगाबाद शहरातील रामा इंटरनॅशनल आणि हॉटेल अंजता अंबेसेडर यांनाही लुबाडल्याची माहिती दिली. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास एपीआय अनिल कंकाळ करत आहेत.

Aurangabad
औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार ठार

हॉटेलमध्येच पगार न दिल्याने सुरु केला हा धंदा-

विशेष म्हणजे या प्रकरणातील अटकेतील आरोपी भिमसेंट जॉन हा तामिळनाडूमध्ये एका हॉटेलमध्ये काम करत होता. दरम्यान हॉटेलमालकाने ३ हजार ७०० रूपये बुडविले होते. हॉटेल मालकाने पगार बुडविल्यानंतर त्याने फसवणूकीचा धंदा सुरू केला होता. तेव्हापासून तो आजवर केवळ हॉटेलचीच कित्येक रुपयांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे, त्यासाठी आजवर त्याने पाच सहा खोटी नावेही वापरली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com