esakal | पोळ्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

बैलपोळा

पोळ्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन : बैलपोळा सणाच्या खरेदीसाठी शनिवारी (ता.चार) शेतकऱ्यांनी आठवडी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा विसर पडल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान शहरातही ठिकठिकाणी पोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची दुकाने थाटण्यात आली होती.

हेही वाचा: मंत्री डॉ. भागवत कराड सहकाऱ्यांसोबत रमले जुन्या आठवणीत

शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलाशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण सोमवारी (ता.सहा) साजरा होणार आहे. त्यामुळे या सणाच्या खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांनी गर्दी केली. यंदा पावसाने सुरुवातीपासून वक्रदृष्टी केल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. मात्र, गत आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पोळा सणासाठी शेतकऱ्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र आहे. भोकरदन शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न्यायालय परिसर, महात्मा फुले चौक तसेच शनिवारच्या आठवडी बाजारात झुली, नाथा, गोंडे, गेजा, घुंगरू, कवडीमाळा, दोरी, रंगबिरंगी झुल, घुंगरांचा पट्टा, पितळी घंटा, लाल हिरव्या रंगाचे गोंडे, काळ्या धाग्यात बनवलेली दिटमणी यासह पोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी दुकाने सजली होती.

हेही वाचा: सहा जणांनी काढले बनावट जात प्रमाणपत्र

खांदे मळणीला मिळाले पाणी

गत सहा वर्षांपासून तालुक्यात अत्यल्प पावसामुळे कोरडा दुष्काळ होता. गतवर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिला. तर त्यात यंदाही पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही अपेक्षित पाऊस नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. मात्र, चार दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढे, तलाव खळाळून वाहत असून, खांदे मळणीला पाणी उपलब्ध झाले आहे.

loading image
go to top