औरंगाबाद : जुना बाजार भागात हटविल्या टपऱ्या

जिओ कंपनीच्या बेकायदा मोबाइल टॉवरचे साहित्य देखील जप्त
जुना बाजार भागात हटविल्या टपऱ्या
जुना बाजार भागात हटविल्या टपऱ्याsakal

औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी (ता. ३०) जुना बाजार, बुढीलेन भागात कारवाई करून रस्त्यावरील पाच टपऱ्या हटविल्या. त्यानंतर पडेगाव भागात रिलायन्स, जिओ कंपनीच्या बेकायदा मोबाइल टॉवरचे साहित्य देखील जप्त करण्यात आले.

जुना बाजार, बुढीलेन रस्त्यावर काहींनी रस्त्यालगत अतिक्रमण करून टपऱ्या टाकल्या होत्या. या टपऱ्या भाड्याने देऊन पैसे उकळले जात होते. मात्र टपऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांनी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार टपरीधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या पण संबंधिताने प्रतिसाद दिला नाही.

जुना बाजार भागात हटविल्या टपऱ्या
CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

त्यामुळे अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने मंगळवारी या टपऱ्यांवर कारवाई केली. दरम्यान पडेगाव भागत मिसबाह कॉलनी येथे रिलायन्स जिओ कंपनीतर्फे बेकायदा मोबाइल टॉवर उभारला जात असल्याची तक्रार आली होती. या बेकायदा टॉवरचे काम थांबवून साहित्य पथकाने जप्त करण्यात आले. संबंधित घरमालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई प्रशासकांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, रवींद्र देसाई, मजहर अली, पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांनी पूर्ण केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com