esakal | चिंता करू नका; नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध- राज्यमंत्री सत्तार
sakal

बोलून बातमी शोधा

अब्दुल सत्तार

चिंता करू नका; नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध- सत्तार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. शेतीचे मोठे नुकसान झाले, पिके वाहून गेली, याची पाहणी करण्यासाठी महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. त्यांनी नुकसानीची पाहणी करून बाधित शेतकरी व त्यांच्या कुटूंबियांना दिलासा दिला.

हेही वाचा: सेलू: लोअर दूधना धरणाचे चार दरवाजे उघडले

जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील विविध गावात नुकसानीची माहिती घेतली. चिंता करू नका, राज्य सरकार जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत धीर दिला. औरंगाबादसह मराठवाड्यात झालेल्या ढगफुटी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष ठेवून आहेत. झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री दररोज आढावा घेतला जात आहे.

शेतकऱ्यांनी चिंता करू नये अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री सत्तार यांनी धीर दिला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची औषधविक्री व्यवस्था रामभरोसे?

औरंगाबाद जिल्ह्यातील बऱ्याच मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी साचले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस या पिकांना मोठा फटका बसला असून फळपीकही उध्वस्त झाले आहे.

जनावरे, रस्ते,पूल तसेच घरांचीही पडझड झाली असून महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणांनी तातडीने पंचनामे करावे. जेणे करून तंतोतंत नुकसानीची माहिती समोर येईल. पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदती बाबत घोषणा करतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

यावेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, माजी आमदार नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, गंगापूरचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध गावातील सरपंच व शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top