esakal | कोरोनाकाळात दौलताबाद किल्ल्यावरील पक्षी-प्राण्यांची 'अशी' भागवली जातेय तहान-भूक
sakal

बोलून बातमी शोधा

Daulatabad fort

कोरोनाकाळात दौलताबाद किल्ल्यावरील पक्षी-प्राण्यांची 'अशी' भागवली जातेय तहान-भूक

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे बंद करण्यात आलेली आहेत. याचा फटका दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर राहणाऱ्या पक्षी-प्राण्यांनाही बसत आहे. पर्यटक नसल्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळावरील प्राण्यांचे खाण्यापिण्याचे हाल सुरु आहेत. त्यात उन्हाळा असल्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे प्राणी व्याकूळ झाले आहेत. या प्राण्यासाठी किल्ल्यावरील कर्मचारी आणि गावातील काही लोक रोज घरुन डब्बा, खाण्याच्या वस्तू आणि फळे पाठवत आहेत.

लेण्या, किल्ला पाहण्यासाठी आलेले पर्यटक तेथील माकडांना, पक्षांना काहीतरी खाण्यासाठी टाकतात. त्यावरच या पक्षी, प्राण्यांचे पोट भरते. मागील दोन महिन्यांपासून पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे या ठिकाणचे प्राणी भुकेने व्याकूळ झाले आहेत. पुढील १५ मेपर्यंत सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. ही बाब लक्षात घेता पुरातत्व विभागाचे कर्मचारी आणि गावातील लोकांनी एकत्र येवून या प्राण्यांची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा: Coronavirus|विद्यापीठाच्या वेबसाईटवर समजणार ‘बेड’ची माहिती

देवगिरी किल्ल्यावर जवळपास चारशे ते पाचशे माकडे आहेत. मोरांची संख्या देखील भरपूर आहे. किल्ल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून विविध ठिकाणी प्लास्टीकच्या टाक्यात पाणी भरुन ठेवले आहे. कर्मचारी-अधिकारी घरुन येतांना फळे व विविध खाण्याच्या वस्तू घेऊन येतात. कर्मचारी जेव्हा डब्बा खातात तेव्हा हे माकडे त्यांच्याजवळ येवून बसतात. मुक्या प्राण्यांचे हे दु:ख सहन न झाल्याने मागील वर्षभरापासून हा उपक्रम सुरु आहे. आता गावातील लोक या माकडांसाठी केळीचे कॅरेट पाठवतात, तर कोणी कुरकुऱ्याचे बॉक्स पाठवतात. भारती साहुजी यांनी तर या प्राण्यांसाठी घरुन पोळ्या करुन पाठविण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

हेही वाचा: Corona Updates: काळजी घ्या! मराठवाड्यात २४ तासांत १७१ जणांचा मृत्यू

उपक्रमात यांचा आहे सहभाग-
खुलताबाद आणि दौलताबादमधील गावकरी किल्ल्यावर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या घरी खाण्यापिण्याचे पदार्थ आणून देतात. त्यानंतर रोज सकाळी या प्राण्यांना हे पदार्थ दिले जातात. किल्ल्याचे संरक्षण सहाय्यक संजय रोहणकर यांनी देखील या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. हर्षल श्रीवास्तव, मुरलीधर पवार, समीर साहुजी यांनी या प्राण्यांची भूक भागण्यासाठी आतापर्यंत मदत केली आहे. रविंद्र घाटे, अशोक निंभोरे, सुखदेव नीळ, गौरख बनकर, मोहम्मद इजाज, पंडीत वाबळे, खोसरे, सिद्धार्थ कुमार व इतर कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.

loading image