Chandrakant Khaire: खोक्यांची तीन महिन्यात ईडीकडून चौकशी, भाजपने गोळा केले पुरावे; खैरेंचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Khaire

खोक्यांची तीन महिन्यात ईडीकडून चौकशी, भाजपने गोळा केले पुरावे; खैरेंचा दावा

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना डिवचलं. खोक्यांची तीन महिन्यात ईडीकडून चौकशी होणार असून त्यासाठी भाजपनं पुरावे गोळा केले आहेत, असा दावाच खैरे यांनी केला आहे. (ED will investigate money laundering of Shinde group MLA BJP collected evidence claim by Chandrakant Khaire)

हेही वाचा: 5G Launch : डेटा स्वस्तच झाला, सध्या किती पैसे वाचतात? PM मोदींनी सांगितला हिशोब

खैरे म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी ३६ कोटी रुपये दिले असतील. कारण तशी माहिती मला काही लोकांनी फोन करुन दिली, हे सत्य आहे. त्याशिवाय त्यांना काहीही माहिती होणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे खूप पैसा आहे, कारण त्यांच्याकडे समृद्धी मार्ग होता. पैशाचं प्रचंड प्रमाणात वाटप करायचं आणि स्वतःची ताकद वाढवायची, हा त्यांचा फंडा आहे. कुठे उद्धव ठाकरे आणि कुठे एकनाथ शिंदे असंही ते म्हणाले.

हेही वाचा: Pune News: चांदणी चौक परिसरात कलम १४४ लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

तुमची खोक्यांची जेव्हा चौकशी होईल ना तीन महिन्यांनंतर तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल. या सर्व खोक्यांची चौकशी होणार आहे. यांचे सर्व पुरावे भाजपनं गोळा करुन ठेवले आहेत. यांनी काही गडबड केली की यांच्या एकेकाच्या मागे ते ईडी चौकशी लावून टाकणार, अशा शब्दांत खैरेंनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला.

शिरसाटांसाठी अडीच हजार जणांना फोन

दरम्यान, मला ज्यांनी कोणी पाडलं त्यांनी मोठं पाप केलं, छत्रपतींचा भगवा झेंडा खाली उतरवला आणि रझाकारांचा झेंडा फडवण्यासाठी त्यानं मदत केली, असंही खैरे म्हणाले. पण लोकांनी हे पाहिलंय की चंद्रकांत खैरे पडले तसं परत त्या ठिकाणी काही होईल म्हणून माझ्या सहानुभूतीनं ९ च्या नऊ आमदार निवडून आले आहेत. संजय शिरसाटांसाठी मी मतदानाच्या आदल्या दिवशी अडीच हजार लोकांना फोन केले, असंही खैरेंनी यावेळी सांगितलं.