esakal | CET न दिल्यास दहावीच्या मूल्यांकनानुसार अकरावी प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

CET न दिल्यास दहावीच्या मूल्यांकनानुसार अकरावी प्रवेश

परीक्षा दिलेल्यांना सीईटीतील गुणांच्या आधारेच प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि, ज्यांनी सीईटी दिली नाही, अशा विद्यार्थ्यांना दहावीच्या मूल्यांकनानुसार प्रवेश देण्यात येणार आहेत.

CET न दिल्यास दहावीच्या मूल्यांकनानुसार अकरावी प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सोमवारी (ता.१९) पासून सुरु करण्यात आली आहे. मात्र, सीईटी होणार असतानादेखील काही महाविद्यालयांनी घाईघाईने प्रवेश नोंदणी सुरु केल्याचे समोर आल्याने पुढील आदेश येईपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये, असे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी माध्यमिक शिक्षण विभाग आणि सर्व अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालयांना दिले आहेत. आतापर्यंत दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होत आली आहे.

हेही वाचा: हुश्‍श... औरंगाबाद शहर कोरोनामुक्तीकडे!

राज्यात सात महापालिका क्षेत्रांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रक्रिया राबविली जाते. यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सीईटीच्या आयोजनाची जबाबदारी राज्य मंडळावरच सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य मंडळाकडून सीईटीसाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवारपासून ऑनलाइन नोंदणी विद्यार्थ्यांना करता येत असून, ज्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना सीईटी देणे आवश्यक आहे.

हेही वाचा: औरंगाबाद महापालिकेला मिळाल्या ६ हजार लसी, आज ४० केंद्रांवर लसीकरण

परीक्षा दिलेल्यांना सीईटीतील गुणांच्या आधारेच प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि, ज्यांनी सीईटी दिली नाही, अशा विद्यार्थ्यांना दहावीच्या मूल्यांकनानुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. परंतु, शासनाचे आदेश नसतानाही काही महाविद्यालयांनी निकाल जाहीर होताच नोंदणी करुन प्रवेश प्रक्रिया सुरु केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विभागातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात येते, की २०२१-२२ या वर्षाची अकरावीची प्रवेश प्रक्रिया नमूद कार्यपद्धतीनुसार पार पडणार असल्याने या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत प्रवेश सुरु करण्यात येवू नयेत, असे शिक्षण उपसंचालक साबळे यांनी दिलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे. तसेच सामाईक प्रवेश परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून लिंक उपलब्ध करुन दिल्यानंतर दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही साबळे यांनी म्हटले आहे.

loading image