Fake PMO Secretary with Bodyguard Detained in Beed Pune Connection

Fake PMO Secretary with Bodyguard Detained in Beed Pune Connection

Esakal

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

PMO सचिव असल्याची थाप मारून वावरणाऱ्या एका तोतयाला रविवारी एका बड्या लग्नसोहळ्यात पकडले. त्याच्यासह त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
Published on

बजाजनगर (जि. छत्रपती संभाजीनगर), ता. १६ : आपण पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) सचिव असल्याची थाप मारून तसे वावरणाऱ्या एका तोतयाला रविवारी (ता. १६) येथील एका बड्या लग्नसोहळ्यात पकडले. त्याच्यासह त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. लग्नसमारंभातील सत्कार सोहळ्यात त्याचे नाव पुकारताच अन्य अधिकाऱ्यांना संशय आल्याने हा भंडाफोड झाला. तोतयाचे नाव अशोक भरत ठोंबरे (वय ४५, रा. दिल्ली, मूळ रा. उंड्री, ता. बीड) तर अंगरक्षकाचे नाव विकास प्रकाश पंडागळे (वय ३५, रा. कोंडवा खुर्द, मनीष पार्क, पुणे) असे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com