विमानतळावर बनावट तिकीटाचा भंडाफोड

विमानतळावर बनावट तिकीटाचा भंडाफोड
Published on: 
विमानतळावर बनावट तिकिटाचा भंडाफोड -- प्रवाशाला विमानतळावरच अडवले; १५ महिन्यांपूर्वीचा क्रमांक वापरून सहा हजारांत विक्री -- छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : विमानाचे तिकीट हातात, सुरक्षा तपासणी पार केलेली. मात्र, विमान कंपनीच्या संगणक प्रणालीतील एका पडताळणीने संपूर्ण बनावटगिरीचा पर्दाफाश झाला. तब्बल १५ महिन्यांपूर्वी कोची ते बंगळुरू प्रवासासाठी वापरलेल्या पीएनआर क्रमांकावर नाव बदलून हुबेहूब बनावट तिकीट तयार केले आणि ते सहा हजार रुपयांना विकण्यात आल्याचा प्रकार चिकलठाणा विमानतळावर उघडकीस आला. याप्रकरणी विलास लंबे याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सतीश मधुकर भोळे (वय ४६, रा. एन-८, सिडको) हे इंडिगो कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी तक्रार दिली. शुक्रवारी (ता. दोन) सकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगर ते मुंबई या इंडिगोच्या (६ ई - ६१२६) विमानाने प्रवास करण्यासाठी ज्ञानेश्वर राऊत (रा. नायगव्हाण) विमानतळावर पोचले. त्यांनी तिकीट दाखवून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची तपासणी पार केली. मात्र, विमान कंपनीच्या प्रणालीत तिकीट तपासताना पीएनआर क्रमांक एन ७ के ५ पीक्यू संशयास्पद असल्याचे समोर आले. या क्रमांकावर २२ जून २०२५ ला राहुल रघुनाथन यांनी कोची ते बंगळुरू प्रवास केल्याची नोंद होती. जुन्या तिकिटातील तपशिलात फेरफार करून त्यावर राऊत यांचे नाव टाकले होते. ---- विमानतळावर रॅकेट असण्याची शक्यता मयूर पार्क परिसरातील विलास लंबे याने विश्वास संपादन करून सहा हजार रुपये रोख घेत बनावट तिकीट दिल्याचे चौकशीतून समोर आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिघोत करीत आहेत. बनावट तिकिटांच्या माध्यमातून विमानतळावर प्रवेश मिळवून देणारे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com