सालगड्याने ओलांडला लाखाचा पल्ला, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती संकटात

हल्ली निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला
Wheat Farming In Aurangabad
Wheat Farming In Aurangabadesakal
Updated on

पाचोड (जि.औरंगाबाद) : गुढीपाडव्याला शेती कसण्यासाठी नवीन सालगडी व मुनीम ठेवण्याची अनेक वर्षाची रित असली तरी दिवसेंदिवस सालगड्याची कमी वेळेत अधिक मोबदल्याची अपेक्षा वाढल्याने त्यांनी कष्टाच्या कामाकडे पाठ फिरविली आहे. एवढेच नव्हे, तर सालगड्याच्या वार्षिक मोबदल्याने लाखाचा टप्पा पार केल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडून त्यांनी आपली शेती बटई व ठोक्याने देण्यास पसंती दिल्याचे चित्र पैठण तालुक्यासह चौफेर पाहावयास मिळत आहे. हल्ली निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असून अनेक मोठ्या जमिनदारांनी गावभर खेळणारे पाणी हरवल्याने नेहमीच्या बखाडीला कंटाळुन गुरांची एकेक दावण रिकामी करत तर कुणी जगण्याच्या लढाईत जमिनी विकून शहरं गाठली, तर अनेकांनी सालगडी व मजुर मिळत नसल्याने जमिनी पडीक ठेवण्यापेक्षा 'त्या' बटई व ठोक्याने देण्यास पसंती दिली आहे. (Farmers In Trouble, Farm Labourers Taking Much Money In Aurangabad)

Wheat Farming In Aurangabad
Aurangabad | बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू, बाप-लेकाला पोलिसांनी पकडले

त्यामुळे अनेक शेतमजुर, ऊसतोड कामगार काही हंगामासाठी शेतमालक बनले असुन त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आता लाखो रुपयांचे उत्पन्न घेण्यास सुरवात केल्याचे चित्र पाचोडसह (ता.पैठण) परिसरात पाहावयास मिळते. दहा-बारा वर्षाच्या कालखंडापासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचे चटके असहाय्य झाले. कधी ओल्या, तर कधी कोरड्या दुष्काळाच्या संकटाचा दाह वाढून माणसांची जनावरांविषयी आस्था कमी होऊन त्यांनी पळायचं तरी कुठवर या चिंतेने खचून अलीकडील काळात दावणीच्या गुरांना बाजार दाखवून 'औत ' व 'बारदाना ' मोडला. शेती साथ देत नसल्याने 'तो' शंभर एकराचा धनी असुनही कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. अनेकांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्येस कवटाळले. शेतात कामे करण्यास त्यांना माणसं मिळत नसल्याने मनुष्यबळा अभावी तोट्यात शेती करणे त्यास परवडेना. स्वत: घरच्या घरी शेती होत नसल्याने अनेक त्रस्त शेतकऱ्यांनी जमिनी विक्रीस काढल्या, परंतु शेतीला ग्राहक ही मिळेना व ग्राहक मिळाले तर ते खूपच पडत्या दराने मागतात. त्यातच सालगड्याची कमी वेळेत अधिक मोबदल्याची अपेक्षा वाढल्याने काम करणाऱ्याच्या संख्येत लक्षणीय घट झाली. पूर्वी कोरडवाहू जमिनी असल्याने हंगाम संपला की, सालगड्याला दोन -तीन महिने काम नसायचे. पहाटे पाच वाजता झोपेतून उठून सालगडी मालकाच्या दारात हजर होऊन गोठ्यातील झाडलोट, घरातील कामे करत असे. रात्री घरी जेवण उरकून तो पुन्हा मालकाकडे जाऊन गाई - म्हशींना चारा वैरण, स्वच्छता आदी कामे करत. आता मात्र स्थिती बदलली. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच ते काम करून घरी जातात. वर्ष भर त्यांना शेतावर कष्ट करावे लागत असल्याने काम करण्याची त्यांची मानसिकता बदलली. पेरणी, सोंगणी, खुरपणी, नांगरणी, मोगडणी आदी कामासाठी मजुरटंचाई निर्माण झाली. त्यातच त्यांच्या मजुरीसह बी- बियाणे, खते यांच्या भावांत दुप्पट वाढ झाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी जमिनी बटई अथवा ठोक्याने देण्यास आता पसंती दिली आहे. (Aurangabad)

Wheat Farming In Aurangabad
मांस निर्यातीवर बंदी नाही,कारण डाॅलर मिळतात; ओवैसींची मोदीं सरकारवर टीका

सध्या पाचोडसह थेरगाव, दावरवाडी, हर्षी, वडजी,केकत जळगाव, कडेठाण आदी ठिकाणच्या धनदांडग्या व मोठ्या जमिनदारांनी आपल्या जमिनी मनुष्यबळाअभावी शेतमजुर, ऊसतोड कामगारांना बटईने दिल्या तर काहीं नी वीस - पंचवीस एकराचे पट्टे कायमचे विकून औरंगाबाद, पैठण येथे फ्लॅट घेऊन ते भाड्यावर दिले. ते शेतीपेक्षा अधिक किफायतीचे असल्याचे सांगतात. सालगड्याला पन्नास ते साठ हजार रुपये व सालचंदी म्हणुन दोन -पाच क्विंटल धान्य देण्याची रित होती. मात्र गतवर्षापासून सालगडी चांगलाच भावांत आला असुन आता एक लाख तर काही ठिकाणी एक लाख दहा हजार रुपये व सालचंदी म्हणुन चार -पाच क्विंटल धान्य असा आता त्यास मोबदला देण्यात येत आहे. परिसरातील जयकुमार बाकलीवाल, प्रकाश निर्मळ, मोदानी सेठ, सुभाष निर्मळ, हाजी याकूब पटेल,पठाण, बप्पासाहेब निर्मळ, लतीब पठाण, बद्री निर्मळ आदीनी आपल्या जमिनी बटईने दिल्या असुन बटईदार मिरची, कापुस, तुर, भेंडी, चवळी, पपई, ज्वारी, ऊसाची लागवड करुन संसाराला बळकटी देत आहे.

Wheat Farming In Aurangabad
शिवसेना म्हणजे 'ढ' सेना, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

जयकुमार बाकलीवाल (जमीनदार) : मनुष्यबळाची कमतरता व निसर्गाच्या वक्रदृष्टीमूळे शेतीवर झालेला खर्चही निघत नसल्याने दिवसेंदिवस शेती वजाबाकीची ठरत आहे. बागायती जमीन बटईने देणे परवडत नसल्याने ती पडीक ठेवण्यापेक्षा बटईने दिलेली बरी. बटईदाराने मोठ्या कष्टातून फुलवलेली शेती यावर्षी दिलासा देणारी ठरेल.

शेख बाबु, रफीक पठाण (शेतमजूर, बटईदार ) : कधी पाऊस, तर कधी दुष्काळ त्यामुळे हाताला काम मिळण्याची चिंता लागून असायची, ऊसतोडीला गेल्यावर रक्ताचे पाणी करुनही दोन पैसे शिल्लक राहत नसे, फक्त आयुष्य ढकलण्यासाठी मदत होत असे. परंतु शेती बटईने करुन जीवापाड मेहनत केली व आयुष्याला कलाटणीच मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com