
धुळे-सोलापूर महामार्गावर पुलावरुन कार कोसळून अपघात, ४ जण गंभीर जखमी
चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद ) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी फाट्याजवळील जोड पुलावर औरंगाबादकडे जाणारी कार (एमएच २० बीवाय ४२४१) चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार पुलावरून खाली कोसळल्याची घटना गुरुवारी (ता.चार) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. कारमधील चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाहतूक पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने लगेच औरंगाबादला (Aurangabad) हलवले. (Four People Injured In Car Accident On Dhule Solapur Highway)
हेही वाचा: जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची घसरण, १४२ वरुन १५० स्थानी
घटनेची माहिती मिळताच महामार्गावर गस्तीवर असलेले वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शेख व पोलीस हवालदार अशोक बर्डे, पोलीस नाईक जारवाल व चालक चव्हाण यांना घटनेची माहिती मिळाताच घटनास्थळी लगेच दाखल झाले व जखमींना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलवले.
हेही वाचा: Aurangabad News | पैठणमध्ये पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
या अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. हा अपघात (Accident) एवढा भीषण होता की गाडी पुलाच्या खाली कोसळत दूरवर फरफटत गेली.
Web Title: Four People Injured In Car Accident On Dhule Solapur Highway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..