

गारखेडा : ‘माँ’ असा आवाज देत एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची एका भामट्याने फसवणूक केली. ‘तुमच्या मुलाचा चेक आला. तो लॅप्स होईल!’ अशी थाप मारून महिलेच्या अंगावरील एक लाख रुपयांचे दागिने त्याने लंपास केले. हा प्रकार शनिवारी (ता. २४) सकाळी साडेसातला गारखेडा भागातील एका हॉस्पिटलमध्ये घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.