लातूर : महिलांसाठी मोफत सीटी बस सुरू करा; अमित देशमुख

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या महापालिकेला सूचना, पंधरा दिवसांची मुदत
free city bus for women Amit Deshmukh latur
free city bus for women Amit Deshmukh latur sakal

लातूर : महापालिकेच्या वतीने शहरातील महिलांना मोफत सीटीबस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर वाहतूक बसमधून महिलांना मोफत प्रवास योजना पंधरा दिवसांत कार्यान्वित करावी, अशी सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. महापालिका कशा पद्धतीने याची अंमलबजावणी करते याकडे आता लक्ष लागले आहे.

free city bus for women Amit Deshmukh latur
३५ गुंठ्यात कपाशीचे विक्रमी उत्पादन

महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील महिलांना मोफत सीटी बस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दिवाळीपासून ही योजना सुरू केली जाईल, अशी घोषणाही झाली होती. पण, नंतर मात्र या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. या संदर्भात ‘सकाळ’ने सोमवारच्या (ता. ३१) अंकात ‘महिलांची मोफत सीटीबस सेवा घोषणा हवेतच’ असे वृत्तही प्रकाशित केले होते. या संदर्भात सोमवारी पालकमंत्री अमित देशमुख यांनी एका बैठकीत आढावा घेतला. महापालिकेची पदाधिकारी तसेच प्रशासनाचे म्हणणेही त्यांनी ऐकून घेतले. सर्व अडचणी दूर करून येत्या पंधरा दिवसांत ही योजना सुरू करावी, अशा सूचना श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.

free city bus for women Amit Deshmukh latur
विशाल फटेविरुध्द 129 तक्रारी! मालमत्ता विकून दिली जाणार गुंतवणूकदारांची रक्‍कम

सर्व सिग्नल व्यवस्थेचा आढावा

या बैठकीत श्री. देशमुख यांनी शहरातील सर्व सिग्नल व्यवस्थेचा आढावा घेतला. सिग्नल कार्यान्वित करण्यासाठी महापालिका व पोलिस यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. येथील छत्रपती

चौक, बसवेश्वर चौक, बाभळगाव चौक, गरूड चौक, नवीन रेणापूर नाका, रेल्वे मार्ग चौक यासह नवीन पॉईंट निश्चित करून सिग्नल बसवावेत. ट्रॅव्हल्स व भाड्याने चालणाऱ्या वाहनासाठी स्वतंत्र वाहनतळ उभारावेत, बांधकाम परवाने देताना पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी, रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करून वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावावी, सर्व्हिसरोड मोकळे करून घ्यावेत आदी निर्देश या बैठकीत श्री. देशमुख यांनी महापालिकेला दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com