Sachin Garad : किराणा व्यवसायातून राजकारणात झेप! कामगाराच्या मुलाच्या हाती अर्थ-बांधकामची धुरा; सचिन गरड यांचा संघर्षमय प्रवास

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदांच्या निवडणुकांमध्ये भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन कल्याण गरड यांची अर्थ व बांधकाम सभापतिपदी झाली निवड.
Sachin Garad

Sachin Garad

sakal

Updated on

- शिवाजी बोडखे

बजाजनगर - जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदांच्या निवडणुकांमध्ये बजाजनगर-वडगाव गटातून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन कल्याण गरड यांची अर्थ व बांधकाम सभापतिपदी निवड झाली. वाळूज महानगरातून प्रथमच जिल्हा परिषदेत इतक्या महत्त्वाच्या पदावर कामगाराच्या मुलाला प्रतिनिधित्व मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com