Gangapur Accident : गंगापूर-वैजापूर मार्गावर जीप-दुचाकी अपघातात तीन जणांचा मृत्यू

Vaijapur Road Crash : गंगापूर-वैजापूर मार्गावरील वरखेड फाट्याजवळ भरधाव जीपने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य व त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.
Gangapur Accident

Three Dead in Road Accident

Sakal

Updated on

गंगापूर : भरधाव जीप (स्कॉर्पिओ) व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य व त्यांचा एक वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाले. गंगापूर-वैजापूर मार्गावरील वरखेड फाट्याजवळ सोमवारी (ता. आठ) सकाळी ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा (ता. वैजापूर) येथून सजन राजू राजपूत (वय २८), पत्नी शीतल सजन राजपूत (२५) व त्यांचा मुलगा कृष्णांश सजन राजपूत (एक) हे दुचाकीने (एमएच-२०, सीक्यू-०७६६) वाळूजला (छत्रपती संभाजीनगर) आपल्या घरी निघाले होते. गंगापूर-वैजापूर मार्गावरील वरखेड फाट्याजवळील नांदूर मधमेश्वर कालव्याजवळ येताच सकाळी आठच्या सुमारास जीपने (एमएच-१९, बीयू-४२१४) त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com