Gangapur Maize Crop Crisis : करपलेली मका मुरघाससाठी विकण्याची वेळ ; उत्पादन खर्चही निघणे कठीण; पश्चिम महाराष्ट्र-कर्नाटकातून चाऱ्यासाठी मागणी

Farmers Sell Green Maize for Fodder and Silage : गंगापूर तालुक्यात पावसाअभावी मक्याचे पीक करपल्याने शेतकऱ्यांना हिरवी मका मुरघासासाठी विकावी लागत आहे.
Gangapur Maize Crop Crisis

Gangapur Maize Crop Crisis

esakal

Updated on: 

गंगापूर : पावसाअभावी उभी पिके करपून गेली असून, गोदावरी नदीकाठचा भाग वगळता संपूर्ण तालुक्यात पिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. तालुक्यात तब्बल २१ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली होती; मात्र पावसाअभावी दाणे भरण्याआधीच पिके सुकू लागल्याने अखेरचा पर्याय म्हणून शेतकरी हिरवी मका जनावरांच्या चाऱ्यासाठी (मुरघास) विकत आहेत. या विक्रीतून केलेला उत्पादन खर्चही जेमतेम निघत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी किंवा बोअरवेलची सोय होती, त्यांनी सुरवातीला मका जगवली; मात्र ऑगस्टमध्ये पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे भूजल पातळी खालावली. परिणामी, उभे पीक वाळून पूर्णपणे वाया जाण्यापेक्षा जे हातात येईल ते पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी कवडीमोल भावाने मका विकत आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि लगतच्या कर्नाटक भागातून मोठ्या संख्येने व्यापारी व शेतकरी गंगापूर तालुक्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी ही मका खरेदी करण्यास येत आहेत.

Gangapur Maize Crop Crisis
Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

सध्या एका एकरातून सरासरी १० ते १२ टन हिरवी मका निघत असून, तिला प्रतिटन दोन हजार रुपये असा दर मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण पीक विकून शेतकऱ्यांच्या हाती केवळ २० ते २४ हजार रुपये येत असून निव्वळ नफा शून्य ठरत आहे. दरम्यान, विशेष बॅगमध्ये हवाबंद करून ठेवलेला मक्याचा मुरघास अनेक महिने टिकतो. हा चारा पौष्टिक, चवदार आणि दुग्धोत्पादनासाठी उत्तम असल्याने बाहेरील व्यापारी व दुग्ध व्यावसायिक या चाऱ्याला पसंती देत आहेत.

सरासरी एकरी खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळेबंद

मशागत : ५ हजार रुपये

बियाणे : ४ हजार रुपये

खते : ५ हजार रुपये

फवारणी : ३ हजार रुपये

अंतर्गत मशागत : २ हजार एकूण उत्पादन खर्च : १८ ते २० हजार रुपये

Gangapur Maize Crop Crisis
आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

"तालुक्यात जून-जुलैमध्ये सरासरी पाऊस झाला; मात्र ऑगस्टमध्ये केवळ ३१ टक्के पाऊस पडला. २० ते ३० दिवसांचा मोठा खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. उपलब्ध पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना तातडीने संरक्षित पाणी द्यावे. ज्या ठिकाणी मक्याला कणसे आलेली नाहीत, तिथे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जनावरांसाठी मुरघास तयार करून साठवून ठेवावा."

- बापूसाहेब जायभाये,

तालुका कृषी अधिकारी, गंगापूर

" पावसाअभावी पीक डोळ्यांदेखत जळून खाक होण्यापेक्षा पदरात काहीतरी पडेल या विवंचनेतून मका चाऱ्यासाठी विकावी लागत आहे. चार महिन्यांचे कष्ट आणि पाण्याचा विचार केला तर हातात काहीच उरत नाही, फक्त केलेला खर्च जेमतेम निघत आहे."

- सुमीत नावंदर,

शेतकरी, शिंगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com