छत्रपती संभाजीनगर : शहरातून पॅलेस्टाइनच्या गाझाला फंडिंग होत असल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे फंडिंगच्या नावाखाली ९९ लाख रुपये गोळा करून त्यातील केवळ १० लाख रुपये रक्कम परदेशात पाठवले गेल्याचे समोर आले..या प्रकरणी एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) तक्रारीवरून बुधवारी (ता. १२) सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यासंबंधीची कागदपत्रे आणि पुरावे केंद्रीय गुप्तचर विभागाकडे देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. सय्यद बाबर अली सय्यद मेहमूद अली ऊर्फ सय्यद बाबर अली रजवी कादरी (रा. बदाम गल्ली, किराडपुरा) असे संशयित आरोपीचे नाव आहे..पोलिस तक्रारीचा आशय असा ः शहरातील चंपा चौकातील इमाम अहमद रजा फाउंडेशन ही संस्था पॅलेस्टाइनमधील युद्धाने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी समाजमाध्यमांवर निधी गोळा करते. एटीएसने अहमद रजा फाउंडेशनच्या नोंदणीबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून माहिती घेतली. त्यात ही संस्था धर्मादाय आयुक्त येथील नोंदणीकृत नसल्याचे समोर आले. यासह संशयित आरोपी हा रजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन नावाची संस्थाही चालवतो..ही संस्था मुंबई येथे नोंदणीकृत असल्याचे समोर आले. रजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन लोकांना पॅलेस्टाइनमधील नागरिकांची मदत करत असल्याचे व्हिडिओ प्रसारित करते. समाज माध्यमांद्वारे पॅलेस्टाइन आणि गाझामधील मदतकार्यांना पाठिंबा देण्याचा दावा करून हा निधी उभारला जात होता. .विशेष म्हणजे रजा एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये निधी उभारून परदेशात पाठविण्याबाबत कुठेही उल्लेख नाही. त्यात पॅलेस्टाइन आणि गाझाला मदत करण्याच्या नावाखाली संस्थेच्या अधिकृत बँक खात्यात ही रक्कम न घेता स्वतःच्या वैयक्तिक खात्यात आरोपीने घेतल्याचे दिसले..एटीएसने स्वतः पन्नास रुपये वर्गणी देऊन याची खातरजमा केली. त्यात हा निधी संशयिताच्या खात्यावर जमा होत असल्याचे दिसले. चार जुलै २०२४ ते सहा ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण ९० लाख ९९ हजार ८९३ रुपये जमा झाले. यातील ९० लाख ९९ हजार ६४५ रुपये एवढी रक्कम काढण्यात आली. .एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड.समाज माध्यमांद्वारे पॅलेस्टाइन व गाझामधील मदतकार्यांना पाठिंबा देण्याचा दावा करून लोकांचा विश्वास संपादन करीत संशयिताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वैयक्तिक बँक खात्यावर रक्कम जमा करून लोकांची फसवणूक केली. यामुळे एटीएसच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.