esakal | सोन्याच्या किमती वाढणार!
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

केंद्र सरकारने 15 जानेवारीपासून हॉलमार्क अनिवार्य केले. हा निर्णय घेतला असला तरी वर्षभराच्या आत व्यापाऱ्यांना या प्रणालीचा अवलंब करावा लागणार आहे; मात्र जिल्ह्यासाठी केवळ एकच हॉलमार्क केंद्र आहे. हॉलमार्कमुळे सोन्याची शुद्धता ग्राहकांना कळणार आहे. यामुळे मोठी पारदर्शकता मिळणार आहे. 

सोन्याच्या किमती वाढणार!

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : इराण-अमेरिकेतील संघर्षाचा भारतात होणाऱ्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला. आंतरराष्ट्रीयस्तरावरील घडामोडीमुळे सोने-चांदीच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली. या वाढीबरोबर आता केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दागिन्याच्या किमतीत आणखी वाढ होणार आहे, अशी माहिती सराफा असोसिएशनने दिली. 

केंद्र सरकारने 15 जानेवारीपासून हॉलमार्क अनिवार्य केले. हा निर्णय घेतला असला तरी वर्षभराच्या आत व्यापाऱ्यांना या प्रणालीचा अवलंब करावा लागणार आहे; मात्र जिल्ह्यासाठी केवळ एकच हॉलमार्क केंद्र आहे. हॉलमार्कमुळे सोन्याची शुद्धता ग्राहकांना कळणार आहे. यामुळे मोठी पारदर्शकता मिळणार आहे. 

हेही वाचा - ...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू

भरावे लागणार परवाना शुल्क 
हॉलमार्कसाठी सराफा व्यवसायिकांना ऑनलाइन नोंदणी ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डसकडे (बीआयएस) करावी लागणार आहे. यात प्रामुख्याने सराफा व्यवसायिकाला ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर परवाना मिळणार आहे. दोन कोटीच्या आत उलाढाल आहे अशांना 11 ते 12 हजार रुपये शुल्क लागणार आहे. ज्यांची दोन कोटीपेक्षा जस्त उलाढाल त्यांना 25 ते 35 हजार रुपये खर्च येणार आहे. हे केवळ परवाना शुल्क झाले. त्यानंतर प्रत्येक दागिन्याच्या उत्पादन तपासणीसाठी व्यापाऱ्यास 50 रुपये खर्च येणार आहे. या तपासणीत शुद्धतेची तपासणी होते. त्यानुसार त्या सोन्याच्या उत्पादनाचे कॅरेटची टक्‍केवारी सांगितले जाते. ही टक्‍केवारी मार्किंग करून देण्यात येते. परवाना मिळाल्यानंतर नंबर मिळाल्यानंतर बारकोड क्रमांक टाकल्यावर बीआयएसचा हॉलमार्क करून दुकानाचे बारकोड मिळेल. 
हेही वाचा -राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला
सात हॉलमार्क सेंटरची गरज 
शहरात 450 तर जिल्ह्यात 1,200 हून अधिक सराफा व्यवसायिक आहेत. शहर आणि जिल्ह्यातील मोठे सराफा व्यवसायिक मुंबई आणि पुणे येथील मॅनिफॅक्‍चरीयर्स युनीट मधून हॉलमार्क करून घेतात. यांच्यासाठी शहरात पाच ते सात हॉलमार्क सेंटरची गरज आहे. उलाढाल कमी असल्याने आता सराफा व्यवसायिकांना गुंतवणूक वाढवावी लागणार असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले. हॉलमार्क सेंटर सुरू करण्यासाठी एका सेंटरला 60 ते 70 लाख रुपयांची मशनरी घ्यावी लागते. 

हेही वाचा -  अॅकॅडमिक ऑडिट नसल्यास महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द

हॉलमार्कमुळे छोट्या सराफा व्यवसायिकांना गुंतवणूक वाढवून घ्यावी लागणार आहे. याशिवाय शहरात सेंटर सुरू न झाल्यास त्यांना मुंबई-पुण्याला हॉलमार्क करायला जावे लागणार आहे. आता वर्षभरात 20 कॅरेटचे (84 टक्‍के) दागिने विक्री करावे लागणार आहेत. वर्षभनंतर 20 कॅरेटचे दागिने मेल्ड करून 22 कॅरेट किंवा 18 कॅरेट करावे लागतील. 14, 18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याची पुढे विक्री होईल. मुळात हॉलमार्कचे पाच ते सात सेंटर सुरू होणे गरजेचे आहे. 
- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष सराफा असोसिएशन 
 

loading image