esakal | हे सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल! -आमदार सुजितसिंग ठाकूर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्यात आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे सर्व आमदार मुंबईकडे रवाना अशा आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. याविषयी स्थानिक आमदारांशी संपर्क साधला असता औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब हे तिन्ही आमदार आपापल्या मतदारसंघात असल्याचे त्यांनीच स्पष्ट केले. 

हे सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल! -आमदार सुजितसिंग ठाकूर

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाने कोणत्याही आमदाराला मुंबईला बोलाविलेले नाही. त्यामुळे कोणताही आमदार मुंबईला गेलेला नाही. हे सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल. भाजपला हे सरकार पाडण्यात कोणतेही स्वारस्य नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मंगळवारी (ता.२६) ‘सकाळ’शी बोलताना दिले. 

राज्यात आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे सर्व आमदार मुंबईकडे रवाना अशा आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. याविषयी स्थानिक आमदारांशी संपर्क साधला असता औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रशांत बंब हे तिन्ही आमदार आपापल्या मतदारसंघात असल्याचे त्यांनीच स्पष्ट केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

राणे यांचे मत वैयक्तिक 
याविषयी सुजितसिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे हे त्यांचे मत आहे. अन्याय सहन न करण्याचा त्यांचा स्वभाव महाराष्ट्र ओळखून आहे. कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सरकारला कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णतः अपयश आले आहे. म्हणूनच नारायण राणे यांनी ही मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाची ही मागणी नाही, भूमिकाही नाही. हे सरकार पाडण्यात भाजपला स्वारस्य नाही. या सरकारमध्ये समन्वय नाही.

पृथ्वीराज चव्हाण वेगळे बोलतात तर विदर्भातील मंत्री वेगळे बोलतात. असे सगळे सर्व सुरू आहे. काँग्रेसचे काही मंत्री वरिष्ठ नेतृत्वाकडे जाऊन अधिकारी आमचे ऐकत नसल्याच्या तक्रारी करीत आहेत. हे सरकार त्यांच्या कर्मांनीच पडेल, आम्हाला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही, असेही आमदार ठाकूर यांनी नमूद केले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image