esakal | इलेक्ट्रॉनिक्स बाजाराचीही यंदा बंपर दिवाळी
sakal

बोलून बातमी शोधा

eloctric market.jpg

सहा महिन्यांपासून ठप्प असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेत दसऱ्यापासून नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीसाठी ग्राहक गर्दी करीत आहेत

इलेक्ट्रॉनिक्स बाजाराचीही यंदा बंपर दिवाळी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद  : सहा महिन्यांपासून ठप्प असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेत दसऱ्यापासून नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीसाठी ग्राहक गर्दी करीत आहेत. यात वॉशिंग मशीन, मिक्सरसह किचन साहित्याला सर्वाधिक आहे. दसऱ्याला ८० टक्के विक्री झाली असून इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेसाठी दिवाळी बंपर राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सण-उत्सवाच्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी विक्री वाढत असते. यंदा ही बाजारपेठ सहा महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊनमुळे बंद होती. आता अनलॉकनंतर ई-कॉमर्स कंपन्यांचे व्यापाऱ्यांसमोर आव्हान होते, मात्र लॉकडाऊनच्या काळात व्यापारी सक्षम झाले. ई-कॉमर्सला टक्कर देण्यासाठी त्या कंपन्यांच्या तोडीसतोड स्किम आणि सुविधा स्थानिक व्यापारी देत असल्याने दसरा चांगला गेला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आता दिवाळीची बुकिंगही सुरु झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही बुकिंग होणार आहेत, असेही विक्रेत्यांना सांगितले. कोरोनामुळे घरकाम करणाऱ्यासाठी आवश्‍यक असलेली वॉशींग मशीन, इतर किचनमधील उपकरणांना मागणी सर्वाधिक आहे. दसऱ्याच्या महुर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्के खरेदी झाली. वॉशिंग मशिन, ५५ इंची एलईडी टीव्ही, ३०० ते ५०० लिटरचे फ्रिज असे अनेक मोठे उपकरणाची खरेदी झाली. वेगवेगळ्या ऑफर्स व सवलीतीमुळे ग्राहक वाढले आहेत. अनेक उपकरणाचा तुटवडाही जाणवला आहे. टि.व्ही, फ्रिज, फॅन, एसी यासह इतर उपकरणांचीही दिवाळीसाठी बुकिंग करण्यात येत आहेत. विविध ऑफर्समुळे ग्राहकांचाही फायदा होत असल्याचे विक्रेते अजय शाह यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)