esakal | आरोग्य मंत्र्याच्या बैठकीनंतर औरंगाबादेत वाढले कोरोनाचे रुग्ण - हरिभाऊ बागडे

बोलून बातमी शोधा

null

औरंगाबाद शहरातही एकच रुग्ण होता. २६ एप्रिलला औरंगाबादेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पासून रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली आज ती संख्या बाराशे पर्यंत गेली आहे. सरकारला औरंगाबाद शहरातील वाढता रुग्णाचा आकडा कंट्रोल करता आलेला नाही म्हणूनच सरकारचा आम्ही निषेध करत असल्याचेही हरिभाऊ बागडे यांनी माध्यमांना सांगितले.

आरोग्य मंत्र्याच्या बैठकीनंतर औरंगाबादेत वाढले कोरोनाचे रुग्ण - हरिभाऊ बागडे

sakal_logo
By
प्रकाश बनकर


औरंगाबाद : राज्यसरकार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरले आहे. यामुळेच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. औरंगाबादेत ही एकच रुग्ण होता. २६ एप्रिलला आरोग्य मंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी(ता.२२) केला.

 महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपतर्फे आज जिल्हा कार्यालयासमोर "माझे अंगण हेच रणांगण' हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, संजय केनेकर, प्रवीण घुगे, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, कचरू घोडके यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा- शेतकरी संघटनेचे मुठभर कापुस जाळा आंदोलन

हरिभाऊ बागडे म्हणाले, सरकार तर्फे नागपूरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे म्हणाले होते, मात्र अजूनही शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफ झालेली नाही. कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही नव्याने कर्ज मिळाले नाही. लॉक डाऊन करण्यात आले, तेव्हा राज्यात केवळ ४० रुग्ण होते.

आता कोरोनाव्हायरस मध्ये इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र पुढे आहे सध्या रुग्णांची संख्या ४३ हजारच्या ही पुढे गेला आहे. औरंगाबाद शहरातही एकच रुग्ण होता. २६ एप्रिलला औरंगाबादेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पासून रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली आज ती संख्या बाराशे पर्यंत गेली आहे. सरकारला औरंगाबाद शहरातील वाढता रुग्णाचा आकडा कंट्रोल करता आलेला नाही म्हणूनच सरकारचा आम्ही निषेध करत असल्याचेही हरिभाऊ बागडे यांनी माध्यमांना सांगितले.

 अजूनही 40 टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे शरद पवार यांनी साखरे संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले. मात्र मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कापसाविषयी कुठलेच पत्र राज्यातील मंत्र्यांना लिहिले नसल्याचे सांगितले.