esakal | औरंगाबादच्या बेगम यांची तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका; नातेवाईकांनी मानले पोलिसांचे आभार
sakal

बोलून बातमी शोधा

Hasina Begum News

मी खूप कठीण काळातून गेले असून आता पाकिस्तानमधून परतल्यानंतर मला आपल्या देशात शांत व जसे मी स्वर्गात आले असे वाटत आहे.

औरंगाबादच्या बेगम यांची तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका; नातेवाईकांनी मानले पोलिसांचे आभार

sakal_logo
By
एएनआय वृत्तसंस्था

औरंगाबाद : पासष्ट वर्षांच्या हसिना बेगम तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानमधून औरंगाबादला परतल्या आहेत. त्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. पासपोर्ट हरविल्यानंतर हसिना यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. औरंगाबाद येथील रेल्वेस्थानकावर मंगळवारी (ता.२६)  नातेवाईक आणि पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. 

दौलताबाद किल्ल्यावर गर्दीच गर्दी! किल्ल्यावरील पर्यटकांना खालीच येता येईना...

मी खूप कठीण काळातून गेले असून आता पाकिस्तानमधून परतल्यानंतर मला आपल्या देशात शांत व जसे मी स्वर्गात आले असे वाटत आहे. मला बळजबरीने तुरुंगात टाकण्यात आले होते, असे हसिना बेगम यांनी युएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. मी औरंगाबाद पोलिसांचे आभार मानते की ते याबाबत त्यांनी रिपोर्ट दिल्यामुळे माझी सुटका झाली आहे. बेगम यांचे नातेवाईक ख्वाजा जैनिद्दिन चिश्ति यांनी ही हसिना बेगम यांना औरंगाबाद पोलिसांनी मदत केल्यामुळे त्या आपल्या मायदेशी सुखरुप पोहोचल्या आहेत.

Success Story: ३० गुंठ्यात १० टन टरबूजाचे उत्पादन; देवळ्याच्या टरबूजांची दुबईला निर्यात

त्यामुळे त्यांचे आभार मानले आहे. १८ वर्षांपूर्वी बेगम या लाहोरमध्ये पतीच्या नातेवाईकांना भेटायला गेल्या होत्या. तेथे त्यांचे पासपोर्ट हरवले होते.  त्यांना पाकिस्तानमधील तुरूंगात १८ वर्षे बंद करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेगम या औरंगाबादेच्या रशीदपुरा भागातील रहिवाशी आहेत. हा भाग सिटी चौक पोलिस ठाण्याअंतर्गत येतो. त्यांचा विवाह दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता, जे की उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे रहिवाशी आहेत. बेगम यांनी पाकिस्तानमधील न्यायालयात विनंती अर्ज केला होता, की मी निर्दोष आहे. यानंतर न्यायालयाला औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला माहिती पुरवली. यात बेगम यांचे औरंगाबाद येथे स्वतःचे घर असून ते सिटी चौक पोलिसांच्या अंतर्गत येते. पाकिस्तानने गेल्या आठवड्यात बेगम यांची तुरुंगातून सुटका केली आणि त्यांना भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवले होते.   

संपादन - गणेश पिटेकर    

loading image