पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
पेपरफुटी प्रकरण
पेपरफुटी प्रकरणSakal

औरंगाबाद : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन, यापुढील परीक्षा महाराष्‍ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

आरोग्य विभागाने खासगी कंपनीमार्फत पदभरती प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेत वारंवार गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी २४ ऑक्टोबर; तर गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात आली. परीक्षेपूर्वी झालेल्या गोंधळाप्रमाणेच परीक्षेच्या दिवशीही राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला होता. तसेच प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर फिरल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणात पोलिसांनी दहा पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे घेण्यात आलेल्या दोन्ही परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली आहे. आता दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढील परीक्षा लोकसेवा आयोगामार्फतच राबविण्यात याव्यात, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे.

पेपरफुटी प्रकरण
इंदापूर : निमसाखरच्या बंधाऱ्याच्या भराव खचला

भरतीत लाखो रुपयांचा घोटाळा करुन नोकरीला लावून घेण्यात येत असेल, तर गरीब विद्यार्थ्यांनी काय करायचे? आरोग्य विभाग परीक्षेतील घोटाळेबाज अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच पुन्हा परीक्षा घेवून १५ हजार पाचशे पदांची पारदर्शक मेगाभरती करावी.
- नितीन मोहिते (विद्यार्थी)

रात्रंदिवस आभ्यास करुन हातात काहीच पडले नाही. आरोग्य विभागाच्या परिक्षेत जो घोटाळ झाला, त्यात गरीब होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. पैशाच्या जोरावर गरीब विद्यार्थ्यांना फासावर चढवले जात आहे.
- सचिन तोडकर (विद्यार्थी)

पेपरफुटी प्रकरण
पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आय.टी. कंपन्या मध्ये निवड : शिरकांडे

परीक्षेतील घोटाळयामुळे विद्यार्थ्याना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. आर्थिक देवाण घेवाण झाल्याचे समोर येत आहे. यातील दोषींवर कडक कारवाई व्हावी. तसेच बोगस लागलेल्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
- मनीष नरवडे, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com