

Emotional Shock in Latur’s Chakur After Mother–Daughter Deaths
Sakal
प्रशांत शेटे
चाकूर: उपचारासाठी मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या तयारीत असताना आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या धक्क्याने कोलमडलेल्या मुलीने आईच्या मृत्यूची सल मनातच ठेवत दुसऱ्याच दिवशी प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना चाकूर येथे घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.