esakal | हर्सूल तलावाच्या भिंतीला तडे 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

खड्डे खोदून तड्यांची तपासणी करण्यात आली. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता तथा अधीक्षक अभियंता (जायकवाडी धरण) श्री. काळे व सहायक कार्यकारी अभियंता हिरे यांना बोलावून घेतले. त्यांनी हे तडे धोकादायक नाहीत. त्यात मुरूम व वाळू मिक्स करून दबाई करण्याची सूचना केली. 

हर्सूल तलावाच्या भिंतीला तडे 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः तब्बल चौदा वर्षांनंतर हर्सूल तलाव भरला असून, महापालिकेने या तलावातून पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात तलावाच्या मुख्य संरक्षक भिंतीलगतच्या डाव्या बाजूकडील भिंतीला दोन ठिकाणी सूक्ष्म तडे गेल्याचा प्रकार पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यामुळे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यासह सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.२०) या भिंतीची पाहणी केली. या प्रकाराने तलावाला धोका नसला तरी मुरूम, माती व वाळू टाकून डागडुजी केली जात आहे. 

शहर परिसरात यंदा जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ऐतिहासिक हर्सूल तलाव काठोकाठ भरला आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारीही केली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पाहणीसाठी गेले असता, तलावाच्या मुख्य भिंतीलगत सूक्ष्म तडे गेल्याचे समोर आले आहे. स्मृतिवनाजवळ हे तडे असून, दोन ठिकाणी एक ते दीड इंचाचे दोन ते तीन मीटर जाडीचे हे उभे सूक्ष्म तडे आहेत. तड्यांची खोली २० ते २३ सेंटीमीटर आहे, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

चिकणमातीही धरण भरण्याच्या दिवसांमध्ये वाळलेली असते. त्यात पाणी मुरल्यामुळे ती प्रसरण पावते. त्यामुळे सूक्ष्म पद्धतीचे तडे गेले आहेत. काही ठिकाणी काही काही अंतरावर बारीक तडे गेले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 
दरम्यान, गुरुवारी सकाळी श्री. पांडेय यांच्यासह कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता पदमे, बाविस्कर यांनी पाहणी केली. त्यानंतर खड्डे खोदून तड्यांची तपासणी करण्यात आली. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता तथा अधीक्षक अभियंता (जायकवाडी धरण) श्री. काळे व सहायक कार्यकारी अभियंता हिरे यांना बोलावून घेतले. त्यांनी हे तडे धोकादायक नाहीत. त्यात मुरूम व वाळू मिक्स करून दबाई करण्याची सूचना केली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तलावावर नागरिकांना बंदी 
हर्सूल तलावाचे काम १९५४ मध्ये झाले. दरम्यानच्या काळात या तलावाच्या वर म्हणजेच जटवाडा, ओव्हर परिसरात १९ पाझर तलाव बांधले गेले. त्यामुळे हा तलाव काही वर्षांपासून भरला नव्हता. १४ वर्षांनंतर तलाव भरल्याने अनेक युवक पाणी पाहण्यासाठी येऊन तलावाच्या संरक्षण भिंतीलगत जीवघेणी स्टंटबाजी करतात. त्यामुळे जीवित हानीचा धोका असल्याने आता नागरिकांना तलावावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

loading image
go to top