esakal | गृहमंत्र्यांनी इस्कॉनचे केले कौतुक, रोज २२ हजारावर गरजूंची भागवतात भूक
sakal

बोलून बातमी शोधा

Home Minister Anil Deshmukh

इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन, अन्न सेवा प्रकल्पास गृहमंत्री अनिल देशमुख भेट देत २२ हजारांहून अधिक गरजूंना दिल्या जाणाऱ्या अन्न सेवा प्रकल्पाची कार्यप्रणाली शिस्तबद्धता आदींची नोंद घेत यात सहभागी सेवकांचे कौतुक केले.

गृहमंत्र्यांनी इस्कॉनचे केले कौतुक, रोज २२ हजारावर गरजूंची भागवतात भूक

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन, अन्न सेवा प्रकल्पास गृहमंत्री अनिल देशमुख भेट देत २२ हजारांहून अधिक गरजूंना दिल्या जाणाऱ्या अन्न सेवा प्रकल्पाची कार्यप्रणाली शिस्तबद्धता आदींची नोंद घेत यात सहभागी सेवकांचे कौतुक केले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लॉकडाउनमुळे सध्या अत्यावश्यक सेवेत असणारे पोलिस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी आदींना पोषणयुक्त आहार सेवा देणारा प्रकल्प, बजाज उद्योग समूह यांच्या प्रमुख आर्थिक साहाय्याने, त्याचबरोबर स्कोडा ऑटो, अजित सीड्स , लायन्स क्लबच्या विविध सदस्यांच्या साह्याने कार्यरत २४ मार्च २०१९ पासून रोज साधारण २२ ते २५ हजार लाभार्थ्‍यांना औरंगाबाद शहरात ही सेवा दिली जात आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मध्ये खिचडी दलिया पुलाव वेळोवेळी व्हिटॅमिन सीयुक्त फळे जसे मोसंबी याचे वाटप केले जात आहे. इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनची महाराष्ट्र राज्यभरात अशी आठ केंद्र मुंबई, मीरा रोड, वाडा, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर कार्यरत असून, महाराष्ट्रात रोज एकत्रितपणे रोज दोन लाख लाभार्थ्यांपर्यंत आहार सेवा पुरवली जात असून, आतापर्यंत एकूण ३० लाख लाभार्थींपर्यंत आहार सेवा पुरवण्यात आली आहे. 

अन्नामतचे राज्य प्रमुख डॉक्टर राधाकृष्ण दास, सी. पी. त्रिपाठी (सल्लागार सामाजिक उपक्रम बजाज उद्योग समूह) यांच्या मार्गदर्शनाने तसेच शहरातील समितीत राजेश भारुका सुशील धूत, भावेश सराफ, सुदर्शन पोटभरे, विशाल लदनिया, रणधीर पाटील विभागीय प्रमुख जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था (मराठवाडा) व लायन्स क्लब व विविध सामाजिक सेवा संस्थांचे स्वयंसेवक समन्वयकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशाल कदम, प्रफुल्ल अग्रवाल यांचीही उपस्थिती होती. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा