

Rare Gesture by District Collector Wins Hearts at Retirement Ceremony
Sakal
धाराशिव: गेली ३५ वर्षे ज्यांनी साहेबांच्या शब्दाला शब्द जोडला, प्रशासनाच्या फाइल्सपासून ते साहेबांच्या वेळेपर्यंत सगळे काही निष्ठेने सांभाळले; त्या माणसाच्या निवृत्तीचा प्रवास हा केवळ ‘निरोप’ नसावा, तर तो एका कृतज्ञतेचा सोहळा असावा, हाच विचार करून जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडविले. निमित्त ठरले ते निवृत्तीनिमित्त स्वीय सहायकाचा त्यांनी केलेला आगळा सन्मान.