बोराळकर हे विजयी व्हावेत हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न आणि ते पूर्ण करू, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्‍वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja_20munde

आता उंटावरून शेळ्या हाकण्याची गरज नाही तर सर्वांनी मैदानात उतरण्याची गरज आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या.

बोराळकर हे विजयी व्हावेत हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न आणि ते पूर्ण करू, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्‍वास

औरंगाबाद : भाजपमध्ये बंडखोरी झाली या अफवा आहेत. भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे. भाजप आणि गोपीनाथ मुंडे हे एक समीकरण झाले आहे. या पक्षावर माझं प्रेम आहे. भाजपचा उमेदवार विजयी व्हावा. यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आता उंटावरून शेळ्या हाकण्याची गरज नाही तर सर्वांनी मैदानात उतरण्याची गरज आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे गुरुवारी (ता.१२) गजानन महाराज मंदिर परिसरात उद्घाटन झाले.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : मराठा समाजातील विद्यार्थी संभ्रमात, कोणत्या संवर्गातून अर्ज करावा?

त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी विभागीय आयुक्तालयात जाऊन शिरीष बोराळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, दिल्लीहून येताना विमानामध्ये जागा शिल्लक नव्हती, परंतु बोराळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला हजर राहणे आवश्यक होते. त्यामुळे एका प्रवासाचे तिकिट कापून, रद्द करून मी औरंगाबादमध्ये पोहोचले आहे.

अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा होईल - राज्यमंत्री बच्चू कडू

बोराळकर हे विजयी व्हावेत हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करू असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले महाराष्ट्रातले आपले सरकार गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणुका, यामुळे शिरीष बोराळकर यांना विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हे तर सर्व कार्यकर्त्यांवर आहे. यामुळे कोणताही कार्यकर्ता दुर्लक्ष करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top