Sambhaji Nagar : कॉल ड्रॉप आणि क्रॉस कनेक्शनचे छत्रपती संभाजीनगरात वाढले प्रमाण; बिले भरणारे वैतागले

‘‘हॅलो...मी अमुक अमुक बोलतोय...तुम्ही निघालात का? लवकर या...’ असे म्हणताच समोरचा माणूस ‘कोण बोलतंय...सॉरी... राँग नंबर!’ असे म्हणून कॉल कट करतो. क्रॉस कनेक्शनचा हा प्रकार अनेकदा होतो.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : ‘‘हॅलो...मी अमुक अमुक बोलतोय...तुम्ही निघालात का? लवकर या...’ असे म्हणताच समोरचा माणूस ‘कोण बोलतंय...सॉरी... राँग नंबर!’ असे म्हणून कॉल कट करतो. क्रॉस कनेक्शनचा हा प्रकार अनेकदा होतो. सोबतच तुम्ही एखाद्याला फोल लावला की लगेच कट होतो. एकदा नव्हे, तर वारंवार असेच होते. सध्या अशा समस्यांमुळे नियमित बिले भरणारे मोबाइलधारक वैतागले आहेत. सेल्युलर कंपन्या मात्र ‘जणू काही घडलेच नाही’ अशा आविर्भावात मस्त व्यवसाय करीत आहेत.

शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत काही दिवसांपासून कॉल ड्रॉप आणि क्रॉस कनेक्शन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोबाइलधारकांची डोकेदुखी वाढत आहे. संबंधित व्यक्तीला फोनच लागत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. वारंवार फोन करूनही न लागणे, फोन लागला तरी आवाज ऐकू न येणे, बोलता बोलता कट होणे, तसेच रिंग जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मोबाइल नेटवर्क जॅमिंगचे प्रमाण वाढल्याने अशा समस्यांचा मोबाइलधारकांना सामना करावा लागत असल्याचे एका खासगी सेल्युलर कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले. दरम्यान, बिल भरण्याची तारीख जवळ आली की ग्राहकाला आठवणीने मेसेज करणाऱ्या या सेल्युलर कंपन्यांचे अधिकारी या समस्येवर तोंड उघडायलाही तयार नाहीत.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar : ...तर थेट मीच तुमच्यावर गुन्हे दाखल करेन! ; पैठण रस्त्याची दुर्दशा पाहून जिल्हाधिकारी स्वामी संतापले

‘फाइव्ह-जी’च्या नावावर ग्राहकांच्या माथी ‘थ्री-जी’ चा स्पीड

जिल्ह्यात फाइव्ह-जी सेवा पुरवणाऱ्या तीनही कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक ऑफरमुळे ग्राहक संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. परंतु, त्या तुलनेने कंपन्यांकडे सेवासाहित्य नसल्यामुळे फाइव्ह-जी इंटरनेटचा वेगही मंदावला आहे. अगदी थ्री-जीसारखा स्पीड यूजर्सला मिळत आहे. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले, की ज्या ठिकाणी अशा अडचणी येत आहेत, त्या परिसरातील माहिती कंपनीला पाठवण्यात आलेली आहे. तसेच त्या ठिकाणी आणखी टॉवर उभे करण्याच्या दृष्टीने कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत.

का होतो असा प्रकार?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक शासकीय तर तीन सेल्युलर कंपन्या खासगी व्यवस्थापनाच्या आहेत. वाढती स्पर्धा, मर्यादित ग्राहक आणि फाइव्ह-जी तंत्रज्ञान आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काही सेल्युलर कंपन्यांना टाळे लागले. तर काही कंपन्यांनी विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारला. सेल्युलर कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे ग्राहकांची संख्या वाढली आहे. परंतु, ग्राहकसंख्या पेलवण्याइतक्या पायाभूत सुविधा, सर्व्हर्स, बीटीएस रिपीटर टॉवर्स दोन्हीही कंपन्यांकडे आवश्यकतेनुसार उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात या कंपन्यांच्या मोबाइलधारकांना सध्या ''कॉल ड्रॉप''च्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

‘तक्रार क्रमांक’ देणेही केले बंद

कंपनीच्या सेवेसंदर्भात ग्राहकाने कॉल सेंटरला संपर्क करून तक्रार दिल्यास त्याला तक्रार क्रमांक (डॉकेट नंबर) देणे अनिवार्य आहे, असा ‘ट्राय’चा नियम आहे. तक्रारीचा निपटारा न झाल्यास संबंधित ग्राहकाला त्याविरोधात दाद मागता येते, प्रसंगी अपीलही करता येते. काही सेल्युलर कंपन्या तक्रार नोंदवून घेत आहेत. मात्र, डॉकेट नंबर देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत एका सेल्युलर कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण कक्षातील कर्मचाऱ्याने सांगितले, की तांत्रिक अडचणीमुळे कधी कधी ग्राहकांना तक्रार क्रमांक पाठवण्यास अडचणी येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com