esakal | धक्कादायक! कोविड सेंटरला जाण्याच्या सूचना मिळताच ४३ कोरोनाबाधितांनी काढला पळ
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! कोविड सेंटरला जाण्याच्या सूचना मिळताच ४३ कोरोनाबाधितांनी काढला पळ

धक्कादायक! कोविड सेंटरला जाण्याच्या सूचना मिळताच ४३ कोरोनाबाधितांनी काढला पळ

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि. जालना) : तालुक्यातील टाकळी भोकरदन येथे मंगळवारी (ता.२७) एकाच दिवशी तब्बल ४३ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या बाधितांना आरोग्य विभागाच्या वतीने कोविड सेंटर येथे हलविण्याच्या हालचाली सुरू असताना अचानक सर्व बाधित गावातून फरार झाल्याने एकच खळबळ उडाली. टाकळी भोकरदन हे अंदाजे साडेअकराशे लोकसंख्येचे गाव आहे. गावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने पिंपळगाव रेणुकाई प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आले. त्यानंतर शनिवारी (ता.२४) ग्रामपंचायत कार्यालयात १३१ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल सोमवारी (ता.२६) सायंकाळी प्राप्त झाला. त्यात तब्बल ४३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधितांना तातडीने कोविड सेंटर येथे उपचारासाठी हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या. मात्र, बाधित रुग्णांनी कोविड सेंटरला जाण्यास नकार देत सहकार्य करीत नसल्याने अखेर आरोग्य विभागाने भोकरदन पोलिसांना पाचारण केले. पोलिसांचे वाहन गावात दाखल होताच बाधित रुग्णांनी गावातून पळ काढला. त्यामुळे आलेल्या पथकाला एकही रुग्ण घरी न सापडल्याने पोलिस व आरोग्य विभागाच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. या प्रकाराने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

गावात पथक तळ ठोकून

एकाच दिवशी गावात तब्बल ४३ कोरोना रुग्ण आढळून आल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुवीर चंदेल, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष बावसकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अहमद सिद्दीकी, एस.एम.पांढरे, के एम शिंदे, जी.एम.देशपांडे, आर. आर.राकडे, एन.पी.पोटे, मनीषा पालकर, तलाठी पी. बी. समीनद्रे, ग्रामसेवक पी. आर.गायकवाड, शिक्षक के. आर. जंजाळ आदी गावात उपाययोजना करण्यासाठी ठाण मांडून होते.

हेही वाचा: अंध विद्यार्थ्यांना दृष्टीहिन प्रमाणपत्राची सक्ती नाही, शिक्षण मंडळाचे आदेश

टाकळी गावातील बाधीत रुग्णांना कोविड सेंटर येथे येण्याचे सांगितले. मात्र, कुणीही तयारी दाखविली नाही. सहकार्य मिळत नसल्याने शेवटी पोलिसांची मदत मागविली. त्यांनतर सर्व बाधितांनी पळ काढला. पोलिस पथक व आम्ही गावात दोन तास ठाण मांडून होतो.

- रघुवीर चंदेल, तालुका आरोग्य अधिकारी, भोकरदन

loading image