Leopard Suddenly Appears Near Janefal Road: जानेफळ-ममुराबादवाडी शिवारात उसाच्या शेतातून अचानक बिबट्या बाहेर येताच बैल उधळले आणि मजुरांची एकच धांदल उडाली. गोंधळामुळे बिबट्यानेही भीतीने शेतात पलायन केले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बाजार सावंगी : बिबट्या समोर दिसला तरी, अंगाला थरकाप सुटतो. तोही अतिशय शातीर. सावज गावले की सोडायचे नाही, असा त्याचा खाक्या. आजकाल हा बिबट्या कुठेही दिसू लागलाय.