esakal | रिक्षाचालकाने पोलिसाला केली शिवीगाळ, आता गेला खडी फोडायला
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करुन प्रवासी भरणाऱ्या रिक्षा चालकाला जाब विचारणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली.

रिक्षाचालकाने पोलिसाला केली शिवीगाळ, आता गेला खडी फोडायला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करुन प्रवासी भरणाऱ्या रिक्षा चालकाला जाब विचारणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

युसूफ अन्सारी माहेम्मद अली अन्सारी (२२, रा. पडेगाव) असे त्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. आरोपी रिक्षाचालकाला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान आरोपीने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृंगारे (तांबडे) यांनी फेटाळला.

प्रकरणात वाहतुक शाखेचे कर्मचारी आयनाथ सुक्रे (३६) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी सुक्रे हे बसस्थानकावर कर्तव्यावर असतांना सायंकाळी ७ वाजता मिलकार्नर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा (क्रं. एमएच-२०-बीटी-८३५७) उभी करुन आरोपी युसूफ अन्सारी हा प्रवासी भरत होता.

त्यामुळे सुक्रे यांनी रिक्षा व त्याचा फोटो काढुन त्याला रिक्षा बाजुला घेण्यास सांगितले, त्यावर आरोपीने सुक्रे यांच्याशी वाद घातला. त्यामुळे सुक्रे हे रिक्षात बसले व रिक्षा बाजुला लावण्यास सांगू लागले. तेंव्हा आरोपीने सुक्रे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन रिक्षा वाकडी-तिकडे चालवुन भरधाव मिलकार्नरकडे नेली. त्यामुळे सुक्रे यांनी रिक्षातुन उडी टाकली, संधी साधत आरोपीने तेथुन धूम ठोकली. त्यानंतर सुक्रे यांनी दंडाची ऑनलाईन पावती आरोपीच्या पत्यावर पाठविली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

२८ फेब्रुवारी रोजी सुक्रे व त्यांचे सहकारी खांड्रे हे दोघे बसस्थानक येथे कर्तव्यावर असतांना आरोपी तेथे देखील रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभी करुन प्रवासी भरतांना आढळुन आला. सुक्रे व खांड्रे असे दोघे रिक्षा चालकाकडे गेले, त्यांनी आरोपीला रिक्षा बाजुला घेण्यास सांगत, त्याला दंडाची रक्कम कधी भरणार असे विचारले. त्यावर आरोपीने दोघांना शिवीगाळ केली. व सुक्रे यांची कॉलर पकडुन त्यांना धक्काबुक्की केली. आरोपी रिक्षा पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना सुक्रे यांनी रिक्षा अडविली असता आरोपीने रिक्षा अंगावर टाकुन तुम्हाला मारुन टाकीन अशी धमकी दिली. सुक्रे यांच्या तक्रारीवरुन आरोपी रिक्षा चालकविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा