esakal | औरंगाबाद: पित्याचा खून करणाऱ्या पुत्राला पोलीस कोठडी । Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी

औरंगाबाद: पित्याचा खून करणाऱ्या पुत्राला पोलीस कोठडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : वडीलांनी घरी येवू नये म्हणून बेदम मारहाण करुन वडीलांचा खून करणाऱ्या आरोपी मुलाला रविवारी (त.३) ऑक्‍टोबर रोजी सकाळी क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. त्‍याला ७ ऑक्‍टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.यू. न्‍याहारकर यांनी दिले. विकास भिकनराव शेळके (३३, रा. दलालवाडी) असे आरोपी मुलाचे नाव आहे. भिकन रत्नाकर शेळके (६०, रा. दलालवाडी) असे मृताचे नाव आहे. मयत भिकन हे पत्नी मुलासह दलालवाडी भागात राहतात. भिकन हे मोलमजुरी करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी काम थांबवले होते.

हेही वाचा: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू 

१ ऑक्‍टोबर रोजी भिकन हे विष्‍णु नगर येथे राहणार्या मुलीच्‍या घरुन विकासच्‍या घरी आले होते. त्‍याचा रात्री दहा वाजेच्‍या सुमारास आरोपी विकास याने भिकन हे घरात एकटेच होते. विकासने भिकन यांना घरी येवू नये यासाठी मारहाण केली. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या भिकन यांना तात्काळ घाटीत दाखल केले. उपचार सुरु असतांना डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. प्रकरणात ऋषीकेश ऊर्फ करण कुंठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, वडीलांना मारण्‍यामागे आरोपीचा नेमका हेतू काय होता. आरोपीने कोणाच्‍या सांगण्‍यावरुन गुन्‍हा केला. गुन्‍ह्यात आरोपीला कोणी मदत केली का याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती सरकारी वकीलांनी न्‍यायालयाकडे केली.

loading image
go to top