गांधी आडवा येतो 

file photo
file photo

औरंगाबाद : वैचारिक आणि प्रयोगशील नाटके देणारा लेखक म्हणून शफाअत खान ओळखले जातात. "शोभायात्रा'सारखे नाटक त्यांचेच. काही वर्षांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे "गांधी आडवा येतो' असे मोठे अर्थपूर्ण शीर्षक असणारे नाटक आले होते. तेच लिंगडे-शर्मा या जालन्याच्या जोडीने यंदा कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेत सादर केले. 

अपेक्षाभंग झाला 

या जोडीच्या यापूर्वीच्या नाटकांना स्पर्धेत बक्षिसे मिळालेली आहेत. त्यामुळे प्रख्यात लेखकाच्या अर्थपूर्ण शीर्षकाच्या या नाट्यप्रयोगाकडून पुष्कळ अपेक्षा होत्या; परंतु त्या अजिबात पूर्ण होत नाहीत, हे आरंभीच स्पष्टपणे सांगितले पाहिजे. परिश्रम, पाठांतर चांगले, तांत्रिक बाजू सफाईदारपणे हाताळलेली, एकूण टीमची नाट्यप्रगल्भता यापूर्वी सिद्ध झालेली आहे. असे असूनही अपेक्षाभंग का व्हावा? माझ्या मते, त्यासाठी लेखक, त्याची नाट्यसंहिता आणि सादरकर्ती टीम हे दोघेही जबाबदार आहेत. त्यातही लेखक अधिक जबाबदार आहे. 

संदेश पोहचलाच नाही 

आरंभी वाटमाऱ्या करणाऱ्या वाल्या कोळ्यांचा नंतर वाल्मीकी ऋषी होतो हा रामायणाचा संदर्भ आणि एका मवाली विद्यार्थ्याचे रूपांतर चांगल्या माणसात होते आणि मूळचा चांगला असणारा त्याचा शिक्षक-प्राध्यापक मात्र नंतर गुन्हेगार बनतो, असे कथानक असलेले वसंत कानेटकरांचे गाजलेले "अश्रूंची झाली फुले'सारखे नाटक या दोन्हींच्या संमिश्रणातून मूळचा प्रायोगिक वैचारिक पिंड असणाऱ्या शफाअत खानांनी व्यावसायिक यशाच्या मुटकळी मनाशी बांधत प्रस्तुत नाटक लिहिलेले आहे. 
त्यासाठी त्यांनी नाटकात पात्रांची, प्रसंगांची अशी वाकडीतिकडी मांडणी केलीय की नाटकातून ना मनोरंजन होते, ना "गांधी आडवा येतो' या शीर्षकात अपेक्षित असलेला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोचतो! 

लेखनाचीच झाली गफलत 

या नाटकात मुख्य गफलत लेखकाची आहे. त्यात सादरकर्ते एका छोट्या शहरातील हौशी नाट्यसंच. ते अनेक अडीअडचणी आणि मर्यादांवर मात करीत कसेबसे प्रयोग उभा करतात. दिग्दर्शक स्वतःच प्राध्यापक म्हणून उभे राहतात. त्यांचे दिसणे, बोलणे, हालचाली, भाषा, देहबोली हे कुठेच त्या भूमिकेशी मॅच होत नाही. मग बाकी कलाकारांनी काहीही केले तरी नाटक अपेक्षित उंचीपर्यंत जातच नाही, अशी ही सगळी गोची म्हणजे "गांधी आडवा येतो'. 
 

  • लेखक : शफाअत खान 
  • दिग्दर्शन : सतीश लिंगडे 
  • नेपथ्य : आश्‍लेषा कुलकर्णी 
  •  प्रकाश : सुनील गव्हाणे 
  • संगीत : गणेश लोखंडे 
  •  रंगभूषा : वेशभूषा ः शर्मिष्ठा कुलकर्णी 
  •  कलावंत : सतीश लिंगडे, सुमित शर्मा, रेखा चव्हाण, वर्षा गाडेकर, कल्याणसिंग ठाकूर, दिव्यप्रिया देशमुख, शिवाजी तेलंग, गणेश कळवळे. 
  • - सादरकर्ते : जिग्नेश पाटील, केंद्र संचालक, कामगार कल्याण केंद्र, जालना. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com