निलंगा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून दोघांचा मृत्यू

वादळी वारे व मेघगर्जनेसह वीज पडून औराद शहाजानी येथे एका तरूणाचा, तर तगरखेडा येथे एका शेळ्या राखणाऱ्या व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला.
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच मृत्यू

निलंगा (जि.लातूर) : निलंगा (Nilanga) तालुक्यात पुन्हा रविवारी (ता. नऊ) सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस (Untimely Rain) झाला. यामध्ये वादळी वारे व मेघगर्जनेसह वीज पडून औराद शहाजानी येथे एका तरूणाचा, तर तगरखेडा येथे एका शेळ्या राखणाऱ्या व्यक्तीचा वीज (Lightning) पडून मृत्यू झाला. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून यामुळे शेतकरीही वैतागले आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी वीजा पडून शेतकऱ्यांचे गाय, म्हैस व बैल दगावले होते. तर आजही तालुक्यातील तगरखेडा येथे गोरोबा रामा सुर्यवंशी (वय ६५) यांच्यावर झाडाखाली शेळ्या घेऊन थांबले असता वीज पडुन सायंकाळी सव्वापाच वाजता त्यांचा मृत झाला. (Latur Rain Updates Lightning Kills Two People In Nilanga Block)

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाच मृत्यू
उमरग्यात गारांचा पाऊस, वादळी वाऱ्याने शेत-शिवारात नुकसान

औराद शहाजनी येथील शर्मानगर भागात सुभाष किसनराव देशमुख (वय ३३) हे अंगावर वीज पडून मरण पावले. येळणूर येथील रमेश भिमराव सोळंके यांची गाय व म्हैस वीज पडून मरण पावली असून आर्थिक नुकसान झाले आहे. हंचनाळ येथील शेतकरी चंद्रकांत बिरादार यांच्या गट क्रमांक ६२ मध्ये त्यांचे दोन बैल वीज पडून आज मरण पावले. हलगरा गट क्रमांक ५४ येथील शेतकरी सुरेश संभाजी गंगथडे यांच्या शेतामध्ये त्यांची एक गाय वीज पडून आज सायंकाळी मृत्यू पावले. ताडमूगळी येथे शेषेराव पाटील यांच्या शेतात त्यांची गाय वीज पडून मरण पावली. मदनसुरी सर्वे १९८ मध्ये रेखा संजय चाटले यांच्या शेतात विजपडून गाय मरण पावली आहे. तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पाऊस मेघगर्जनेसह पडला असून विज पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com