
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील जामखेड -रोहिलागड शेतशिवारातील डोंगरावर शनिवारी (ता.10) सायंकाळी बिबट्या थेट मेंढ्यांच्या कळपात घुसला त्याने चार मेंढ्यावर हल्ला केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील अनेक मेंढपाळ चारा पाण्याच्या शोधात अंबड तालुक्यात मेंढ्यांचे कळप घेऊन शेतशिवारातील गायारण जमीन, डोंगरावर दिवसरात्र मेंढ्यांच्या कळप घेऊन ठाण मांडलेल्या मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याची दहशत वाढत चालली आहे.