

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेला लागलेले पेपरफुटीचे ग्रहण सुटायला तयार नाही. आधी ‘नीट’ वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच आता राज्यातील ‘टीईटी’लाही (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटीची वाळवी लागली. टीईटीचा पेपर नेमका आदल्या दिवशीच फुटल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. ‘मुलाचा नीटचा, तर बापाचा टीईटीचा पेपर फुटला’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया आता उमटू लागली. या नियोजनशून्य कारभारामुळे राज्यातील लाखो भावी आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.