esakal | पत्नीशी अश्लील बोलल्याने एकाचा खून, दोघांना बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेयसीचा खून, किनवट तालुक्यातील घटना

पत्नीशी अश्लील बोलल्याने एकाचा खून, दोघांना बेड्या

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : पाच दिवसापूर्वी १० जुलै रोजी एक तरुण बेपत्ता झाल्याची फिर्याद पित्याने पोलिस ठाण्यात दिली. मात्र, गावातीलच Aurangabad एका तरुणाच्या पत्नीशी फोनवर अश्लील बोलून त्रास दिल्याने तिच्या पतीने नातेवाईकाच्या मदतीने सदर तरुणाचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. संजय बाबूराव थोरात (३७, कदीम टाकळी, ता. गंगापूर) Gangapur, अनिकेत सुधाकर आव्हाड (२१, रा. लोणी) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. तर विकास अर्जुन थोरात (२५, रा. कदीम टाकळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विकासचा खून करुन त्याचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना कदीम टाकळी येथे घडली होती. याबाबत तक्रार प्राप्त होताच प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली होती. यावेळी तपासादरम्यान विकास हा एका तरुणाच्या पत्नीशी अश्लील बोलत होता. याबाबत त्यास समजावूनही वारंवार तो त्रास देत असल्याने संजय थोरात, त्याचा मेव्हणा बाळू माणिक नितनवरे (रा.क्रांतीनगर, औरंगाबाद) आणि भाचा अनिकेत या तिघांनी खून केल्याची माहिती मिळाली.man killed in gangapur tahsil of aurangabad glp88

हेही वाचा: एका दिवसात संपल्या दहा हजार कोरोना लसी, आज सात केंद्रावर लसीकरण

दोघे अटकेत, एक फरार

फुंदे यांनी तपासाची तक्रे फिरवत संजय आणि अनिकेत यांना बेड्या ठोकल्या. दरम्यान संजयची चौकशी केली असता, त्याने सदर महिलेस वारंवार अश्लील बोलल्याने नातेवाइकांच्या मदतीने विकासचा काटा काढल्याची कबुली पोलिसांना दिली. या गुन्ह्यातील वरील दोघांना अटक करण्यात आली असून नितनवरे हा फरार असल्याचे निरीक्षक फुंदे यांनी सांगितले.

असा काढला काटा

विकासचा काटा काढायचा असा बेत तिघांनी आखला. त्यानुसार ९ जुलै रोजी सकाळी साडेआठ नऊच्या सुमारास विकास हा नेहमी प्रमाणे त्याच्या कामावर जाण्यासाठी समृद्धी रस्त्याच्या बाजूला असलेल्या थोरात याच्या मळ्याजवळून दुचाकीवर जात होता. दरम्यान त्याला संजय याने आवाज देऊन मळ्यात बोलाविले. तेथे संजयचा मेव्हणा (साला) बाळू नितनवरे, भाचा अनिकेत आव्हाड होते. विकासने दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावली आणि मळ्यात आला असता, संजयने विकासचा दोरीने गळा आवळला, अनिकेतने दगडाने मारहाण केली, तर नितनवरे यानेही मारहाण केली. यातच विकासचा मृत्यू झाला.

हेही वाचा: पावसाचा हाहाकार; शेतातील पिके पाण्यात, नदीलाही पूर

आधी विहिरीचा शोध घेतला अन्

मारहाणीत विकास मरण पावल्याची खात्री झाल्यावर त्याचे प्रेत पोत्यात टाकले, त्याला तारेने आवळून संजयच्याच मळ्यातील आंब्याच्या झाडाजवळ लपवून ठेवले. तेथे नितनवरे थांबला, तर अनिकेत याने संजयच्या अल्टो कारमध्ये (एम.एच.२० एफ.यु-३३०८) कार चालविण्यास घेतली. तसेच संजयने विकासची दुचाकी लासूरकडे दुचाकी लावण्यासाठी जागा शोधली. तिघांनीही परिसरात मृतदेह टाकण्यासाठी विहिरीची पाहणी केली. त्यानंतर तिघांनी मळ्यात लपविलेला संजयचा मृतदेह कारमध्ये टाकला, जाताना रस्‍त्यात थांबून एक दगड कारमध्ये घेत पोत्याला बांधला आणि लासूर स्थानकाकडे आरापूर शिवारातील विहिरीत मृतदेह टाकल्याची कबुली दिली. याप्रकरणातील नितनवरे फरार असल्याची माहिती निरीक्षक फुंदे यांनी दिली. ही कारवाई निरीक्षक फुंदे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संदीप सोळंके, विठ्ठल राख, दिपेश नागझरे, विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, गणेश गांगवे, संजय तांदळे, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, जिवन घोलप, संजय तांदळे यांनी केली.

loading image