Sambhaji Nagar : मांजा विक्रेत्यांना लगाम; घर आणि दुकानाला सील

महापालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एन-१३ भागातील मुजफ्फरनगर येथे एकाचे घर व दुकान सील केले.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : बंदी असताना देखील शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेकजण जखमी होत आहेत. त्यामुळे न्यायालय नॉयलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एन-१३ भागातील मुजफ्फरनगर येथे एकाचे घर व दुकान सील केले.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : देवळाईत सर्वसामान्यांनी उभारले राजमाता जिजाऊंचे भव्य स्मारक

कार्यालयीन अधीक्षक जावेद खान, भरत पचलोरे, सुहास भाले, प्रमोद जाधव, दौलत म्हस्के व संजय पवार यांच्या पथकाने प्रभाग चार अंतर्गत शहरात ठिकठिकाणी तपासणी केली. पोलिसांना एन- १३ येथील मुजफ्फरनगर येथे ५७ हजार रुपये किमतीच्या ७० चक्री आढळल्या. पोलिसांनी मांजा जप्त करून संबंधितावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला.

महापालिकेतर्फे घर व दुकान सील करण्यात आले. ही कारवाई कार्यालयीन अधीक्षक जावेद खान, भरत पचलोरे, सुहास भाले, प्रमोद जाधव, दौलत म्हस्के व संजय पवार यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com