राज ठाकरेंसारखे अनेक येतील अन् जातील पण...; शिवसेनेला विश्वास

राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केली आहे.
Raj thackeray
Raj thackeraySakal

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर यावर शिवसेनेनं (ShivSena) प्रतिक्रिया दिली असून औरंगाबाद आणि मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून असे कितीही राज ठाकरे आले गेले तरी त्याचा इथं काहीही परिणाम होणार नाही, असं शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी म्हटलं आहे. (Many like Raj Thackeray will come and go but will not any effect in Aurangabad says Shiv Sena)

दानवे म्हणाले, औरंगाबादमध्ये आम्ही राज ठाकरेंचं स्वागत करु. पण औरंगाबादच नव्हे तर मराठवाडा सातत्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इथं अनेक सभा गाजवून इतिहास निर्माण केला आहे. असा इतिहास कोणाकडूनही निर्माण होणं शक्य नाही. त्यामुळं राज ठाकरेंसारखेंच्या सभा होतील आणि जातील पण त्यामुळं औरंगाबादवर काहीही परिणाम होणार नाही.

Raj thackeray
'रमजान सुरू आहे म्हणून... पण ३ तारखेला तयारीत राहा', राज ठाकरेंचे आदेश

राहिला प्रश्न अयोध्येचा उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच आधी मंदिर आणि नंतरच सरकार अशी घोषणा केली होती. नंतर सुप्रीम कोर्ट आणि सगळे जागे झाले, पुढं सर्व जागाला माहितीए की सुप्रीम कोर्टानं यासंदर्भात ऐतिहासिक निकाल दिला. आदित्य ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी अयोध्येत जाण्याची घोषणा केली. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा अनेक लोकांनी हात वर केले होते त्यात भाजपही होता. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान असेल. आजही अयोध्येतल्या गल्ली गल्लीत याची चर्चा होते, असंही दानवे यावेळी म्हणाले.

Raj thackeray
हनुमान चालिसा प्रकरण तापलं; शिवसैनिकांचा रवी राणांच्या दारात ठिय्या

दरम्यान, एक मे रोजी औरंगाबादमध्ये सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आज (रविवार) पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. तसेच पाच जूनला सर्व सहकाऱ्यांसह आयोध्येला जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com